Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना कधी मिळणार मानधन? योजनेबाबत अजित पवारांनी केली मोठी घोषणा!

CM Ladki Bahin Yojana update: महिलांनी या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
ajit pawar news
ajit pawar newsesakal
Updated on

रक्षाबंधन सणापूर्वी लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रित रित्या बँक खात्यावर जमा केले जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोलीच्या कार्यक्रमात केली. सुरजागड इस्पात या खाजगी कंपनीच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोलीत आले होते.

यावेळी संबोधित करताना ते म्हणाले, महायुती सरकारने जनसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणारे दीड हजार रुपये मानधन महिलांना आर्थिक बळकट करणार आहे त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज दाखल करावे असेही ते म्हणाले.

१५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान पहिला निधी-

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमचा हा प्रयत्न आहे की १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान पहिला निधी देणार आहोत. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज येतील, त्यांचे अर्ज जुलैमध्ये आले असे समजून त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे आम्ही देणार आहोत, त्यामुळे नुकसान कुणाचेही होणार नाही."

ajit pawar news
Vishalgad Violence : अतिक्रमण काढण्याबाबत दुमत नाही पण... विशाळगड प्रकरणी पटोले यांचे फडणवीसांवर आरोप करणारे पत्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना-

महाराष्ट्रातील गरीब महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा लाभ देणारी ही योजना आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' असं या योजनेचं नाव आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यास मदत होईल. महिलांनी या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ajit pawar news
Ajit Pawar: पुण्यात अजितदादांचा 'मोहरा' फुटणार? शरद पवारांचा सर्वात मोठा धक्का!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com