शिंदे-फडणवीस-अजित पवारांच्या महायुती सरकारने महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी गाजतवाजत सुरु केलेली लाडकी बहिण योजना सत्तेत येण्याची प्रतीक्षा करत असलेल्या महाविकास आघाडीला दोडकी वाटणार नसून उलटपक्षी सध्याच्या रकमेत वाढ करण्याचे वचन आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्यात दिले जाणार आहे.
काँग्रेसने ही योजना हे आमचे फाइंड असल्याचे मविआच्या नेत्यांना सांगितले. महिलांच्या हृदयात जागा करत सत्तेत येण्याचा मार्ग कर्नाटक आणि तेलंगणात याच योजनेने दाखवला आहे .त्यामुळे महाराष्ट्रात संयुक्त जाहीरनामा तयार करताना लाभार्थी महिलेला दरमहा २०० रुपये द्यावेत काय याबद्दल अहवाल मागवण्याचा मनोदय जाहीर केला आहे .