Dussehra Melava 2024 Live Updates: शिवाजी पार्क मैदानावर चिखल, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा संकटात

Dussehra Melava 2024 Live Updates: आज राष्ट्रीय संवयंसेवक संघाचा नागपूरमध्ये, मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावर, पंकजा मुंडेंचा भगवान गडावर आणि दोन्ही शिवसेनेचे मुंबईत दसरा मेळावे होणार आहेत.
Dussehra Melava 2024 Live Updates
RSS Path Sanchalan Mohan BhagwatEsakal

Uddhav Thackeray Live: शिवाजी पार्क मैदानावर चिखल, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा संकटात

ठाकरे गटाचा पारंपरिक दसरा मेळावा आज शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. मात्र मुंबईत पावसाने जोर धरल्याने शिवाजी पार्क मैदानात चिखलाचे साम्राज्य निर्माण झालं आहे.

Mohan Bhagwat Live: आरएसएसच्या विजयादशमी कार्यक्रमात मोहन भागवतांचे भाषण सुरू

विजयादशमीनिमित्त नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्रोचे माजी प्रमुख के सिवन उपस्थित होते. पद्मभूषण आणि इस्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन हे देखील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख

Shastra Puja event of RSS: आरएसएसच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात इस्रोच्या दोन माजी प्रमुखांची उपस्थिती

नागपुरात विजयादशमीच्या निमित्ताने आरएसएसच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्रोचे माजी प्रमुख के सिवन उपस्थित होते. पद्मभूषण आणि इस्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन हे देखील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

RSS Vijayadashami Live: इस्रोचे माजी प्रमुख आरएसएसच्या विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महत्त्वाचा मानला जाणारा विजयादशमी उत्सव आज आयोजित करण्यात आला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. राधाकृष्णन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरातील रेशम बाग मैदानावर शस्त्रपूजन होणार आहे.

Maa Kamakhya Devi Temple Live: विजयादशमीनिमित्त माँ कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

आसाममधील गुवाहटी येथे विजयादशमीनिमित्त माँ कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

RSS Path Sanchalan Live: मोहन भागवत यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनाला सुरूवात

विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी नागपूर येथे 'पथ संचलन' आयोजित केले होते. यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवत हेही उपस्थित होते.

Dussehra Melava 2024 Live: दसरा मेळाव्यातून सुटणार राजकीय बाण

यंदाच्या दसऱ्यानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे दसरा मेळावे होणार आहेत. हा दसरा खास असणार आहे कारण येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कोण काय बोलते याकडे संपूर्ण राज्याचेल लक्ष लागले आहे.

आज राष्ट्रीय संवयंसेवक संघाचा नागपूरमध्ये, मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावर, पंकजा मुंडेंचा भगवान गडावर आणि दोन्ही शिवसेनेचे मुंबईत दसरा मेळावे होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.