मुंबई: बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नेतेमंडळी यावरही राजकारण करण्यात व्यस्त झाले आहेत. एकमेकांवर प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक धक्कादायक आरोप केला आहे. घटनेविरोधात बदलापुरात जनक्षोभ सुरू असताना आता मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य कितपत योग्य आहे, यावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे.