Ajit Pawar on Jammu and Kashmir election
Ajit Pawar on Jammu and Kashmir electionESakal

JK Assembly Elections: अजित पवारांचं ठरलं! जम्मू-काश्मीर विधानसभा लढवणार; उमेदवारही निश्चित

JK Assembly Elections: अजित पवार जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. यासाठी काही उमेदवारही निश्चित झाले आहेत. एकूण २५ जागांवर उमेदवार उतरवणार आहेत.
Published on

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे. यासाठी आता सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. मात्र आता या निवडणुकीबाबत नवी माहिती समोर आली आहे. ही निवडणूक लढवण्यास अजित पवार गटही इच्छुक आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेनंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...