Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेसाठी पैसा नाही, सरकारी कंत्राटदारांची 400 कोटींची बिलं थकवली... राज्यात खळबळ माजवणारा दावा

Maharashtra Government Funding Crisis: काल कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांच्या दालनात धडक दिली. त्यांना रक्षाबंधन झाल्यानंतर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. वित्त विभागाने सर्व कामांच्या निधीच्या फाईल्स थांबवल्याचे त्यांनी सांगितले.
Ladki Bahin Yojana update
Ladki Bahin Yojana updateesakal
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लागू केली. या द्वारे राज्यातील महिलांना महिन्याता १५०० रुपये मिळणार आहेत. तर या रक्षांबधनाला दोन हफ्त्यांचे पैसे एकत्र मिळणार आहे. मात्र राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना ही योजना लागू केल्याचा आरोप विरोधकांनी केला. वित्त विभागाने देखील यावर प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान ठाकरे गटाने आता मोठा दावा केला आहे. 

लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे निधी नसल्याने सरकारी कंत्राटादारांची चारशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची बिले सरकारने थकवली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांनी मंत्रालयावर धडक दिली. सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी दिला जाईल, तोपर्यंत बिलांची रक्कम मागू नका, अशी भूमिका घेतल्याचे ठाकरे गटाने त्यांच्या मुखपत्रात म्हटले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागावर परिणाम-

लाडकी बहिण योजनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला फटका बसला आहे, असे ठाकरे गटाच्या मुखपत्रात दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या दालनाचे नुतनीकरण केले, याचे पैसे थकल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.

कंत्राटदारांचे आंदोलन-

काल कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांच्या दालनात धडक दिली. त्यांना रक्षाबंधन झाल्यानंतर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. वित्त विभागाने सर्व कामांच्या निधीच्या फाईल्स थांबवल्याचे त्यांनी सांगितले.

Ladki Bahin Yojana update
लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला पण सबमिट झाला नाही का? "In Pending To Submitted" असा पर्याय दिसत असेल तर ही बातमी वाचा

संजय राऊतांची प्रतिक्रिया-

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहिण योजनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या योजनेतील फसवणूक निवडणुकीचे दोन महिने आहेत, त्यानंतर लाडकी बहिणीला काही मिळणार नाही, असे म्हटले आहे.

विरोधी पक्षाचे आरोप-

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर आरोप केले की, निवडणुकांपुरता हा लाडकी बहिणीचा उमाळा आहे. त्यांनी म्हटले की, दोन महिन्यांमध्ये त्यांच्या खात्यात पैसे टाकतील आणि महाराष्ट्रात कर्जाचा डोंगर करतील, मग त्यानंतर पळून जातील.

आमदार हल्ल्यांबाबत प्रतिक्रिया-

संजय राऊत यांनी आमदार हल्ल्यांबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, जर सरकार मुखदर्शक बनून हल्ले करत असेल तर हे गुंडगिरीला पोसणारे सरकार आहे. त्यांनी सरकारला दाऊद इब्राहिमच्या टोळीशी तुलना केली आहे.

मशाल चिन्ह आणि निवडणुका-

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा मशाल चिन्हावर निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. धनुष्यबाण हे चोरांच्या हातामध्ये आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Ladki Bahin Yojana update
Ladki Bahin Yojana: आता मराठी मधूनही स्वीकारणार लाडकी बहीण योजनेचे अर्ज; 70% महीलांना मिळणार लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.