Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा दिवाळी-दसरा गोड! ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हप्ता एकाच वेळी जमा

Ladki Bahin Yojana 4th Installment : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana sakal
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना १५०० रुपये दिले जात आहेत . आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते जमा झाले आहेत. यादरम्यान आता या योजनेचा चौथा हप्ता देखील जमा होण्यास सुरूवत झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत तीन हप्त्याचे ४५०० रुपये देण्यात आले आहे. त्यानंतर आता महिलांना ३००० रुपये देण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौथा आणि पाचवा हप्ता अडव्हान्समध्ये एकदाच देण्यात आला आहे.

ही रक्कम ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्याचे एकत्रित हप्ते म्हणजे ३००० हजार रुपये असून ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. ऐन सणासुदीच्या काळात, दिवाळी दसऱ्याच्या तोंडावर महिलांच्या खात्यात ३००० जमा होऊ लागले आहेत.

Ladki Bahin Yojana
Ratan Tata : रतन टाटांना सायंकाळी ४.३० वाजता दिला जाणार अखेरचा निरोप; 'येथे' घेता येईल पार्थिवाचे अंत्यदर्शन

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. सध्या दरमहा दिली जाणारी दीड हजारांची रक्कम टप्प्याटप्प्याने तीन हजार रुपयांपर्यंत वाढवू," अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी अलिबाग येथील एका कार्यक्रमात बोलताना दिली.

येथे संगणकीय कळ दाबून राज्यातील २.३० कोटी महिलांच्या खात्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार, असे एकूण १७ हजार २०० कोटी रुपये वर्ग करण्यात आले. या योजनेच्या वचनपूर्ती कार्यक्रमाचे माणगाव तालुक्यातील मोर्वात आयोजन केले होते. यावेळी शिंदे बोलत होते.

Ladki Bahin Yojana
Ratan Tata : ही दोस्ती..! रतन टाटांसाठी भावुक झाला शंतनू; पोस्ट लिहीत म्हणाला, "दु:ख ही प्रेमासाठी..."

बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर ते तुम्हाला करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येतील.

पैसे आले का?

लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर बँकेकडून तुम्हाला तसा मेसेज येतो. तुम्ही तुमच्या ऑनलाइन बँकिंग अॅपवर पैसे आलेत की ते चेक करु शकतात. तसेच तुम्ही बँकेत किंवा पोस्टात जाऊन पैसे आलेत की याबाबत माहिती मिळवू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.