Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले पण खात्यातून काढायचे कसे? समजून घ्या सोप्या स्टेप

Ladki Bahin Yojana: उपमुख्यमंत्री आणि राज्यातील वित्त खाते सांभाळणारे अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत सरकारने पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याची घोषणा केली होती.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSakal
Updated on

Ladki Bahin Yojana: सरकारने राज्याच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, आतापर्यंत 80 लाखांहून अधिक पात्र महिलांना या योजनेला लाभ मिळणार आहे. महिलांच्या खात्यात 3,000 हजार रुपये जमा झाले आहेत.

उपमुख्यमंत्री आणि राज्यातील वित्त खाते सांभाळणारे अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत सरकारने पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याची घोषणा केली होती.

यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज केले होते. सरकारने पहिल्या हप्त्यात 80 लाख महिलांच्या खात्यात 3000 हजार रुपये जमा केले आहेत. ही रक्कम जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी आहे. पण खात्यातून पैसे कसे काढायचे हे बऱ्याच लाभार्थ्यांना माहिती नाही. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Ladki Bahin Yojana
Ladki bahin Yojana : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या साडेचार हजार बहिणींच्या बँक खात्याला आधार लिंक नाही

खात्यातून पैसे कसे काढायचे?

आता फार कमी लोक व्यवहारांसाठी बँकांमध्ये जातात. पण तुम्हाला खात्यातील रोख रक्कम काढायची असेल तर बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. डेबिट कार्डवरूनही तुम्ही पैसे काढू शकता. आता बहुतांश व्यवहार केवळ ऑनलाइनच केले जातात.

मात्र आजही एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचाच वापर केला जातो. तुम्हाला जर लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढायचे असेल तर एटीएममध्ये जाऊन तुम्ही डेबिट कार्डच्या मदतीने पैसे काढू शकता.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले, आता पुढे काय? मुख्यमंत्र्यांनी दिली आणखी एक गुड न्यूज

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

तुमच्याकडे जर डेबिट कार्ड नसेल तर तुम्हाला बँकेत जावे लागेल. बँकेत गेल्यावर तुम्हाला पैसे काढण्याचा फॉर्म भरावा लागेल. त्यावर तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत त्याचा आकडा टाकाला लागेल. फॉर्मवर दिलेली सर्व माहिती भरावी लागेल.

फॉर्मवर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, सही, फोन नंबर भरावा लागेल. या सोबत तुम्ही बँकेत जाताना तुमचे पासबुक, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत ठेवा. कारण पैसे काढताना तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.