मुंबई : लाडकी बहीण योजनेसाठी एका नवऱ्यानं बायकोसाठी केलेला प्रताप ऐकून सर्वजण आवाक् झाले आहेत. या नवरोबानं आपल्या बायकोचा तब्बल ३० वेळा अर्ज भरला अन् यांपैकी २६ अर्जांसाठीचे पैसेही त्याला मिळाले. हा प्रकार उघड झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली. पण यावर आता मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केलं आहे.