मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी एक महत्वाची मोठी अपडेट समोर येत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ही ३१ ऑगस्ट होती मात्र अद्यापही अनेक महिला अर्ज दाखल करत आहेत . काही भागांमध्ये महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा प्रयत्न करून देखील असंख्य महिलांना अर्ज दाखल करता आलेला नाहीये. या सर्व गोष्टींची दखल घेत राज्य सरकारने या योजनेचा अर्ज भरण्याच अखेरची मुदत एक महिन्याने वाढवली आहे. आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.