Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेचा नवा विक्रम; २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल

Ladki Bahin Yojana Marathi News: 'नारीशक्ती दूत' ॲपमधून दररोज ७ ते ८ लाख अर्ज, अॅपचे ८८ लाख डाऊनलोड्स
One lakh women filled application in Buldhana of ladki bahin yojana
One lakh women filled application in Buldhana of ladki bahin yojanaesakal
Updated on

मुंबई : राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारनं सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला संपूर्ण राज्यातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. योजनेची नोंदणी सुरु झाल्यापासून अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाखांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. लवकरच २ कोटींचा टप्पा गाठेल, अशी माहिती शिवसेना उपनेते संजय निरुपम यांनी दिली.

One lakh women filled application in Buldhana of ladki bahin yojana
Anna Bhau Sathe: "अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या"; वर्षा गायकवाडांची लोकसभेत मागणी

निरुपम म्हणाले, 'नारीशक्ती दूत' ॲपमुळं ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे. या ॲपमधून दररोज ७ ते ८ लाख अर्ज सादर होत आहेत. त्याशिवाय नारीशक्ती दूत या ॲप्लिकेशन्सचे ८८ लाख डाऊनलोड्स झाले आहेत. प्रत्येक मिनिटाला या ॲपचे ८०० डाऊनलोड्स होत आहेत. सगळ्यात जास्त डाउनलोड होणाऱ्या ॲपमध्ये नारीशक्ती दूत ॲप देशात २७ व्या क्रमांकावर आहे. या ॲपमधून प्रत्येक मिनिटाला ६५० अर्ज सादर केले जात आहेत. इतका प्रचंड प्रतिसाद या आधी कोणत्याही योजनेला मिळालेला नाही, असा दावा निरुपम यांनी केला.

One lakh women filled application in Buldhana of ladki bahin yojana
Chetan Bhagat on Rahul Gandhi: 'पप्पू इमेज बदलली', राहुल गांधींचं कौतुक करताना चेतन भगतनं भाजप 'चमच्या' IQ काढला

आतापर्यंत १ कोटी ३० लाख ऑनलाईन ॲप्लिकेशन्स सरकारला प्राप्त झाले आहेत. ऑफलाइन पद्धतीने ५० लाख प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी राज्यातून किमान २ कोटी ते २.५ कोटी महिला पात्र ठरतील, असं सरकारनं उदिद्ष्ट ठेवलं आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत जे ॲप्लिकेशन येतील तेवढे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती निरुपम यांनी दिली. राज्यातून सर्वात जास्त नोंदणी पुणे जिल्ह्यातून झाली आहे. पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत ८ लाख ६३ हजार महिलांनी फॉर्म भरले आहेत.

One lakh women filled application in Buldhana of ladki bahin yojana
Vidya Chavan on Chitra Wagh: "माझ्या सुनेच्या प्रकरणाला दिलं वेगळं वळण..!" विद्या चव्हाणांनी ऐकवला चित्रा वाघ यांचा ऑडिओ, फडणविसांवर केले मोठे आरोप

योजनेसाठी सरकारकडे पैसे नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांचा निरुपम यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, या योजनेसाठी राज्य सरकारनं केंद्राकडं एकही रुपया मागितलेला नाही. ही राज्य सरकारची स्वतःची योजना आहे. काँग्रेससारखी खटाखट योजना नाही. मुख्यमंत्री शब्द पाळणारे आहेत.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अर्ज केलेल्या ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशा कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट २०२४ रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३,००० रुपये जमा होतील, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.