मुंबई - लोकसभेला महायुती विरोधात तयार झालेले वातावरण ‘लाडकी बहीण’ योजनेच्या घोषणेनंतर बऱ्याच प्रमाणात निवळण्यास मदत झाली आहे. राज्यात या योजनेची लोकप्रियता किती आहे, हे आता विरोधकांनाही कळून चुकले आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यघटना बदलाचा मुद्दा विरोधकांना जसा फायद्याचा ठरला; तसे आता विधानसभा निवडणुकीसाठी ‘लाडकी बहीण’ योजना महायुतीला लाभदायी ठरु शकते. त्यामुळेच विरोधकांनी योजनेवर टीका करण्याऐवजी आता लाडक्या बहिणीसाठी महिना तीन हजार रुपये देणारी महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे. आता राज्यात कोणतेही सरकार आले, तरी ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.