Aaditya Thackeray: ''राज्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना'' महामार्गांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचं थेट गडकरींना 'चॅलेंज'

Nitin Gadkari: ''मुंबई पोलीस रस्त्यावरील खड्डे भरत आहेत, कंत्राटदार कुठे दिसत नाही.. याबाबतचा फोटो माध्यमांमध्ये समोर आला आहे. कंत्राटदाराने एकही खड्डा भरलेला नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टरने पाहणी करावी...''
Aaditya Thackeray
Aaditya Thackerayesakal
Updated on

CM Eknath Shinde: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महामार्गांवरील खड्ड्यांवरुन राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनादेखील एक चॅलेंज केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मागच्या दीड-दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राची लूट सुरू आहे. मी 15 जानेवारी 2023 रोजी पत्रकार परिषद घेतली होती, त्यात रस्ते घोटाळा समोर आला होता. मी दावा करत नाही तर पूर्ण माहिती घेऊन सांगतोय की, कोणतंच काम झालेलं नाही.

आदित्य ठाकरे म्हणाले की, कंत्राटदार मित्रांना आवडलं नाही म्हणून कंत्राट रद्द करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. दक्षिण मुंबईतील एक कंत्राटदार आहे त्यानेही काम थांबवलं आहे. त्याने काम थांबवलं की थांबवायला सांगितलं, याबाबत काहीच उत्तर आलेलं नाहीये. मात्र आता परत एकदा 6 हजार कोटींची कंत्राट काढण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा पाच कंत्राटदार मित्रांना हे दिलं जाणार आहे, असं आदित्य म्हणाले.

Aaditya Thackeray
Afzal Ansari: भाजप आमदाराच्या हत्येप्रकरणी कुख्यात गँगस्टरच्या भावाची शिक्षा रद्द! खासदारकीही वाचली

ठाकरे पुढे म्हणाले की, मागे जे कंत्राट काढण्यात आलं त्यात किती काम झालं ते सांगावं? किती जणांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं? त्याचीही माहिती द्यावी. राज्य सरकारचं जे बजेट होतं ते गाजर बजेट होतं, कारण त्यातून काही मिळालेलं नाही. केंद्राचं बजेटही भोपळा बजेट होतं, त्यातूनही राज्याला काहीच मिळालेलं नाही.

खड्ड्यांवरुन बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई पोलीस रस्त्यावरील खड्डे भरत आहेत, कंत्राटदार कुठे दिसत नाही.. याबाबतचा फोटो माध्यमांमध्ये समोर आला आहे. कंत्राटदाराने एकही खड्डा भरलेला नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टरने पाहणी करावी कारण गाडीने येता येणार नाही, असं आवाहन त्यांनी केलं. रस्त्यावरील खड्ड्यांवरुन प्रवास शक्य नसल्याने, गडकरींनी येऊन दाखवावं, असं एकप्रकारे चॅलेंज ठाकरेंनी दिलं.

''नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट स्टॉप करणार आहोत आणि हे काम थांबवणार आहोत. त्यावेळी जो कोणी हा घोटाळा केला, त्याला आम्ही जेलमध्ये टाकू.. मंत्री मिंदे गटाचा असेल त्यालासुद्धा जेलमध्ये जावं लागेल. बांद्रा-वर्सोवा सी-लिंकचं काम अजूनही सुरु झालेलं नाही. राज्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम सुरु झालेली असून गुत्तेदारांना पोसण्याचं काम सुरु आहे..'' असा चिमटा आदित्य ठाकरेंनी काढला.

Aaditya Thackeray
Sangeet Manapaman Teaser Out: सुरु होणार धैर्यधर आणि भामिनीची सुरेल प्रेमकथा ; संगीत मानापमानच्या टीझरची होतेय चर्चा, भामिनीची भूमिका चर्चेत !

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

  • दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करू, असं मुख्यमंत्री म्हणाले होते त्याचा काय झालं?

  • लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम राज्यात सुरु आहे, काम होऊ न होऊ कॉन्ट्रॅक्टमध्ये वाढ झालेली बघायला मिळत आहे

  • सरकारचे खोके, जनतेला धोके.. हे सध्यातरी धोरण सुरु आहे

  • मुंबईतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम किती झाले? हे आम्हाला महापलिकेने सांगावे

  • घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मित्राला कंत्राट द्यायचं म्हणून आपण हे सोसायचा का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.