Ladki Bahin Yojna: अन्नपुर्णा योजनेचा जीआर आला; लाडकी बहीण अन् उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ; नियम व अटी वाचा...

Annapurna Yojna: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत मिळतील. या योजनेस मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना या नावाने संबोधण्यात येईल.
Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojnaesakal
Updated on

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर याच लाभार्थ्यांना आणखी लाभ देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय ३० जुलै रोजी काढण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. तसेच लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून वार्षिक ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

काय आहेत अटी?

  • महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार

  • एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल

  • एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत

  • सदर लाभ केवळ १४.२ कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना मिळेल

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब योजनेस पात्र असतील

  • प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत पात्र असलेल्या ५२.१६ लाख लाभार्थ्यांना योजनेसाठी पात्र धरण्यात येईल

Ladki Bahin Yojna
Chitra Wagh: ''...नाहीतर शरद पवारांना त्रास होईल'', विद्या चव्हाणांच्या पेन ड्राईव्ह प्रकरणानंतर चित्रा वाघ यांचा थेट इशारा

शासन निर्णय

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत मिळतील. या योजनेस मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना या नावाने संबोधण्यात येईल.

एक कोटी अर्ज

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मागच्या आठवड्यापर्यंत एक कोटी अर्ज आले होते. मात्र पावणे तीन कोटी महिला या योजनेत पात्र ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे महिलांपर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे मोहिम राबविली जाणार आहे. अनेक महिलांकडे बँक खाते नाही, आधार कार्ड बँक खात्यासोबत आणि मोबाईलसोबत लिंक नाही, अशा तांत्रिक अडचणींचा सामना महिलांना करावा लागत आहे. त्यामुळे अशा अडचणींवर मात करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.