Ladki Bahin Yojna: ''मुख्यमंत्री हा टीमचा कॅप्टन, त्यामुळे...'' लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरुन एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

Ajit Pawar: ''काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर थाप देण्याचे काम वरिष्ठ करतात, त्यामुळे पोट कुणाचं पोट दुखायला नको. कुटुंबात भांड्याला भांडं लागतं. आमच्यात वाद नाहीत, काही गोष्टीत चर्चा होते.. त्याला महाभारत म्हणतात. पण चर्चा करताना काही ध्येय-धोरणे असतात.'' अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी श्रेयवादाच्या लढाईवर उत्तर दिलं.
Ladki Bahin Yojna: ''मुख्यमंत्री हा टीमचा कॅप्टन, त्यामुळे...'' लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरुन एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
Updated on

CM Eknath Shinde: राज्यामध्ये सध्या सगळ्यात जास्त चर्चा लाडकी बहीण योजनेची आहे. मात्र या योजनेच्या श्रेयवादावरुन महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये जुंपली आहे. अजित पवारांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द गायब केल्याने शिंदेंचे मंत्री देसाईंनी अजित पवारांवर जाहीर नाराजी बोलून दाखवली.

या श्रेयवादाच्या लढाईवरुन खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 'साम टीव्ही'वरील मुलाखतीदरम्यान ते बोलतो होते. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने सर्वसामान्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा विचार करुन अनेक योजना आणल्या आहेत. मला काय मिळतंय, यापेक्षा सर्वांना काय मिळतंय, हे आमचे विचार आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये शेवटी मुख्यमंत्री हाच टीमचा कॅप्टन आहे.. पण श्रेय बहिणींचे आहे.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आमचे टीमवर्क आहे. राज्याचा विकास, लोकांना न्याय, हेच आमचे काम आहे. कामाची पोचपावती लोक देतीलच. पण दिल्लीच्या गल्ली-गल्लीत मला चेहरा करा, असे बोलणारे आहेत. आम्ही जादू नाही काम करतो. चोविस तास काम करतो, दहा वर्षांमध्ये एक दिवस पण सुट्टी घेत नाही.

''काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर थाप देण्याचे काम वरिष्ठ करतात, त्यामुळे पोट कुणाचं पोट दुखायला नको. कुटुंबात भांड्याला भांडं लागतं. आमच्यात वाद नाहीत, काही गोष्टीत चर्चा होते.. त्याला महाभारत म्हणतात. पण चर्चा करताना काही ध्येय-धोरणे असतात.'' अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी श्रेयवादाच्या लढाईवर उत्तर दिलं.

काय म्हणाले शंभूराज देसाई?

याच मुद्द्यावरुन शुक्रवारी सकाळी भूमिका स्पष्ट करताना शंभूराज देसाई म्हणाले की, मंत्रिमंडळातल्या अधिकृत निर्णयाची माहिती दिली जाते किंवा मंत्री देतात.. मात्र अंतर्गत गोपनीय चर्चा उघड करणं योग्य नाही. योजनी आली ती लोकप्रिय झाली की त्याची चर्चा होते. पण केंद्रातील अनेक योजना या पंतप्रधानांच्या नावे आहे. तसेच राज्यातील ही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे सुरू केली आहे.

मात्र, आमच्या घटक पक्षाने प्रचार करताना मुख्यमंत्री हा शब्द वगळला. एक शब्द काय जड नव्हता त्यांना. आम्ही योग्य ते पालन करतो. आमच्या सर्व कार्यक्रमात आम्ही सर्व नेत्यांचे फोटो टाकतो. मात्र राष्ट्रवादी पक्षाकडून तसं झालं नाही. असा दुजाभाव आम्ही केला नाही.. करणार नाही. मात्र घटकपक्षांनी असं करू नये. यावर अजितदादांशी बोलणं झालं नाही. तब्येत बरी नसल्याचं कळलं.. नंतर नक्कीच भेट घेऊन चर्चा करीन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.