Ladki Bahin Yojna: नाक दाबलं, तोंड उघडलं! 'लाडकी बहीण' वाचवण्यासाठी धावपळ, जानेवारीमध्ये जमीन देण्याची सरकारची कबुली

Maharashtra Government: सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं की, किती दिवसात तुम्ही जमीन देणार आहात हे स्पष्ट केलेलं नाही. त्यानंतर राज्य सरकारने तीन महिन्यात ही जमीन सुपूर्द करणार असल्याचं म्हटलं आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही सगळी जमीन हस्तांतरित होईल, असा विश्वास राज्य सरकारने दाखवला आहे.
Supreme Court
Supreme Courtesakal
Updated on

Maharashtra Government Scheme: पुण्यातील पाषाण भागात असलेली हौसाबाई बहिरट यांच्या मालकीची २४ एकर ३८ गुंठे जमीन राज्य सरकारने संरक्षण विभागाला दिली होती. हौसाबाईंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने सरकारला खडसावत लाडकी बहीण योजना थांबवा, असा इशारा दिला होता. त्यानंतर सरकारला जाग आली होती.

या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात हमीपत्र दाखल केलं असून येवलेवाडी पुणे येथील 24 एकर 38 गुंठे एवढी जमीन राज्य सरकार देण्यास तयार आहे. याचिकाकर्त्यांनी ही जमीन स्वीकारण्यास सहमती दर्शवली असून सरकार लवकरात लवकर अर्जदाराला जमीन सुपूर्द करेल, अशा आशयाचे हमीपत्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेले आहे.

Supreme Court
Nagpur Audi Car Accident : नागपुरात ऑडी कारने तीन वाहनांना उडवलं; चालक मद्यधुंद असल्याचा संशय, बड्या भाजप नेत्याशी कनेक्शन?

सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं की, किती दिवसात तुम्ही जमीन देणार आहात हे स्पष्ट केलेलं नाही. त्यानंतर राज्य सरकारने तीन महिन्यात ही जमीन सुपूर्द करणार असल्याचं म्हटलं आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही सगळी जमीन हस्तांतरित होईल, असा विश्वास राज्य सरकारने दाखवला आहे.

राज्य सरकारच्या वन विभागाचे सचिव राजेश कुमार यांनी कोर्टासमोर मागितलेली माफी कोर्टाने मान्य करून माफीची सुमोटो याचिका रद्द केली आहे. सरकारने वेळेत ही जमीन याचिकाकर्त्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून येवलेवाडी पुणे येथील २४ एकर ३८ गुंठे जमीन याचिकाकर्त्यांना द्यावी, असेही निर्देश कोर्टाने दिले.

दरम्यान, सोमवारच्या सुनावणीमध्ये कोर्टाने कुठेही लाडकी बहिण योजनेचा उल्लेख केला नाही. निकालात देखील कोर्टाने त्याचा कुठेच उल्लेख केलेला नाही दिसून आला नाही. यापूर्वीच्या सुनावणीमध्ये सरकारच्या इतर योजना आणि लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा कोर्टाने दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.