Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 9 October 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal
Updated on

मविआच्या बैठकीनंतर नेते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल

मविआच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. मविआच्या बैठकीत झालेल्या मुद्यांवर चर्चा होणार असून अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती आहे.

Ratan Tata News Live : रतन टाटा यांची प्रकृती सध्या स्थिर

उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती येत आहे. रतन टाटा यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. 7 तारखेपासून रतन टाटा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Raj Thackeray Live: फाल्गुनी पाठक यांच्या बोरीवलीतील गरब्याला राज ठाकरेंची उपस्थिती

दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या बोरीवलीतील गरब्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. गरबा पंडालातील देवीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरती केली.

Delhi Live: दिल्लीमध्ये मुख्यमंत्री निवासस्थानावरून नवीन वाद

अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर घर खाली केले होते. मात्र, आता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आतिशी जेव्हा सामान घेऊन दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचल्या तेव्हा त्यांना घराची चावी देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

PWD विभागाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कुलूप लावले असल्याची माहिती असून केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर कायदेशीररित्या घराचं हॅन्ड ओव्हर झाला नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

या संदर्भात दिल्लीच्या विजेलंस विभागाने PWD च्या दोन विशेष अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिवांना नोटीस बजावली आहे. केजरीवाल यांनी पदावर असताना घरात काही काम केलं होतं हे काम अनियमित होतं असा आरोप करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची सुरू आहे. त्यामुळं चावी देण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

Mumbai Live : घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग

घाटकोपरच्या नारायणनगरमध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इथल्या सम्राट शाळेजवळ ही दुर्घटना घडली आहे.

New Delhi Live : दिल्लीतील मुख्यमंत्री निवासस्थानावरून नवीन वाद

दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थानावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हे निवासस्थान खाली केलं होतं. मात्र, आता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आतिशी जेव्हा सामान घेऊन मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचल्या तेव्हा त्यांना या निवासस्थानाची चावी देण्यात आली नाही. PWD विभागानं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कुलूप लावलं असल्याची माहिती समोर आली आहे.केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर कायदेशीररित्या घराचं हॅन्डओव्हर झालं नसल्याचं अधिकाऱ्यांचा म्हणणं आहे.

Delhi Live : मोदींच्या हस्ते नागपूर, शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाचं भूमिपूजन

राज्यातील ७,६०० कोटींच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं....यामध्ये नागपूर विमानतळाचं आधुनिकीकरण व विस्तार कामाचं भूमिपूजन तसंच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नवीन टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन या कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नवीन दहा शासकीय महाविद्यालयांची उद्घाटनं देखील मोदींच्या हस्ते पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

Mumbai Live : मुंबईत परतीच्या पावसाचा धुमाकूळ; सकाळपासून ढगाळ वातावरण

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील अर्धा तासापासून मुंबईसह पश्चिम उपनगरात मॉन्सूनचा परतीचा पाऊस सुरू झाला आहे. सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं अशातच आता उपनगरातील अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली परिसरात मान्सून परतीचा पाऊस सुरू झाला आहे. परिणामी ऑक्टोबर हिटमुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील अर्धा तासापासून पश्चिम उपनगरातील अनेक भागात ढगांच्या गडगटाटासह रिपरिप पाऊस सुरू आहे.

Nashik Live : जरांगेंविरोधात पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर नाशिकमध्ये शाईफेक

नाशिक : मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या डॉक्टरच्या अंगावर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून शाई टाकून निषेध करण्यात आला. सगेसोयरेंच्या मुद्द्यावरुन या डॉक्टरनं वादग्रस्त लिखाण केलं होतं. नाशिकच्या सिडको भागात आयुर्वेद वैद्य डॉ. विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून संभाजी ब्रिगेडकडनं हे कृत्य केलं आहे.

Mumbai Rain Live Update:मुंबईत पावसाची जोरदार हजेरी

मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या सातव्या स्थापना दिन कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या सातव्या स्थापना दिन कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित होत्या.

राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातील रस्त्यांना मंत्रिमंडळानं दिली मंजुरी

राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातील रस्त्यांना मंत्रिमंडळानं दिली मंजुरी दिली आहे. 4,406 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 2,280 किमी रस्त्यांचे बांधकाम होणार आहे.

PM Modi Live: महाराष्ट्रात पर्यटनाची अफाट क्षमता: पंतप्रधान मोदी

भारत आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. महाराष्ट्रात पर्यटनाची अफाट क्षमता असून, आपले सरकार विकास आणि वारसा याला तितकेच महत्त्व देत आहे. शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनलमुळे भाविकांची सोय होणार, असे मनोगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले..

Sharad Pawar Live : सत्यशील शेरकर शरद पवारांच्या भेटीला

सत्यशील शेरकर शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शेरकर इच्छुक आहेत.

Haryana Election Live: मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी घेतली नरेंद्र मोदी यांची भेट

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.तिसऱ्यांदा सलग कार्यकाळासाठी सरकार स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची आहे.

Prakash Ambedkar Live: खातिव सैय्यद नातिकुद्दिनांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

काँग्रेसचे माजी विधानपरिषद आमदार खातिव सैय्यद नातिकुद्दिन यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश.बाळापूर जिल्हा अकोला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर

Maharashtra Vidhansabha Live: निवडणूक कधीही घोषित होऊ शकते

राज्याची निवडणूक कधीही घोषित होऊ शकते, आमच्या संयुक्त बैठका झाल्या आहेत आणि 288 मतदारसंघात महायुतीचे समन्वयक नेमण्यात आले आहेत. महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावा यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Nashik Live : छगन भुजबळ यांच्या ट्विट नंतर दादा भुसे यांचा भुजबळांना सवाल

नांदगाव मनमाड मतदार संघावरून शिवसेना आक्रमक. आम्ही येवल्याची जागा मागितली तर ... ?. छगन भुजबळ यांच्या ट्विट नंतर दादा भुसे यांचा भुजबळांना सवाल

Cabinet Meeting Live : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्यात ३ ते ४ टक्के वाढ करू शकते. सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ५० टक्के महागाई भत्ता मिळतो.

Rahul Gandhi Live : राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करा; भाजप नेत्याच्या याचिकेवर आज सुनावणी

नवी दिल्ली - राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करा, या संदर्भात भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या याचिकेत गृहमंत्रालयाला राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मते राहुल गांधी यांनी इग्लंडचं नागरिकत्व स्वीकारले होते, त्यामुळे त्यांचे नागरिकत्व रद्द करावे अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. २६ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने आम्ही या प्रकरणात सुनावणी करू शकत नाही असे म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने गृहमंत्रालयाकडे या केसंचं स्टेटस काय आहे याची माहिती देण्यास सांगितलं होतं, त्यानंतर आज सुनावणी होणार आहे.

RBI Monetary Policy Meeting Live Updates: सकल देशांतर्गत उत्पादनात वाढ होण्याची शक्यता - शक्तिकांत दास

२०२४-२५ मध्ये किरकोळ चलनफुगवट्याचा दर साडे चार टक्के राहील असा अंदाज, तर वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असून तो ७ पूर्णांक २ दशांश टक्के इतका असेल - शक्तिकांत दास .

Union Cabinet meeting Live Updates: केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक

  • केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक

  • सकाळी १०ः३० वाजता पंतप्रधान निवासस्थानी होणार बैठक

  • या बैठकीत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासंदर्भातील ठराव आज पास होण्याची शक्यता

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Assembly Election Live Updates: बांद्रा पश्चिम विधानसभेत तिरंगी लढतीची शक्यता

  • हिन्दी फिल्मचे प्रसिद्ध गीतकार आणि उर्दूतील मोठे शायर मजरुह सुल्तानपुरीचे चिरंजीव अंदलीब मजरुह सुल्तानपुरी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

  • राष्ट्रीय उलमा कौंसिल पार्टीत होणार आज पक्ष प्रवेश

  • बांद्रा पश्चिम मध्ये शेलार , प्रिया दत्त आणि अंदलीब मजरुह सुल्तानपुरी अशी लढत होण्याची शक्यता

Weather Alert LIVE : विदर्भातील 11 जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?

विदर्भातील ११ जिल्ह्यांत तर खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १० जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मराठवाडा क्षेत्रात मात्र तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Governor Mangubhai Patel LIVE : मध्य प्रदेशचे राज्यपालांनी लोकांसोबत सादर केला गरबा

मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी काल रात्री इंदूरमध्ये एका गरबा कार्यक्रमात सहभाग घेत दांडिया खेळला आणि लोकांसोबत गरबा सादर केला.

Satara News LIVE : सदरबझारमध्‍ये घरगुती वादातून एकाला मारहाण

सातारा : सदरबझारमधील जय मल्‍हार सोसायटी परिसरात एकास मारहाण केल्‍याप्रकरणी सनी शंकर पवार (रा. सातारा) याच्‍यावर सातारा शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याची तक्रार राम गोकुळ पवार (रा. जय मल्‍हार सोसायटी) यांनी नोंदवली आहे. राम पवार हे रविवारी रात्री घरासमोर गप्‍पा मारत बसले होते. त्‍याठिकाणी दारूच्‍या नशेत सनी पवार हा आला. त्‍याने महिन्‍यापूर्वी झालेल्‍या घरगुती वादाच्‍या कारणावरून लाकडी दांडक्‍याने राम पवार यांना मारहाण केली. यामध्‍ये राम पवार हे जखमी झाले असून, याचा तपास हवालदार मेचकर हे करीत आहेत.

Best Bus Accident LIVE : वांद्रेत भरधाव बेस्ट बस अपघातात बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

वांद्रे येथील भरधाव बेस्ट बस अपघातात बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सहावीत शिकणारा अरबाज अन्सारी शाळेतून घरी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसने त्याला उडवले. याप्रकरणी बेस्ट बस ड्रायव्हर विजय बागल यांच्यावर कलम 106 281 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलीये. अटक आरोपीला आज वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. इथे क्लिक करा

Junnar News LIVE : पिंपरीपेंढार येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

पिंपरीपेंढार (ता. जुन्नर) या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात सुजाता रवींद्र डेरे ही महिला ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पिंपरीपेंढार येथील गाजरपट (पिरपट) मधील ही दुसरी घटना आहे. या आधीही या परिसरात बिबट्याच्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती.

Kolhapur News LIVE : महायुती मेळाव्यासाठी वाहतूक मार्गात बदल

कोल्हापूर : तपोवन मैदान येथे बुधवारी (ता. ९) होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. संभाजीनगर चौक ते साई मंदिर, कळंबा हा मार्ग वाहतुकीला बंद करण्यात येणार आहे. तसेच सीपीआर चौक ते टायटन शोरूम, दसरा चौक ते स्वयंभू गणपती मंदिर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या मंत्रिमहोदयांच्या वाहनताफ्यासाठी बिंदू चौक ते देवल क्लब, मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर एकेरी मार्ग शिथिल केला आहे. तपोवन येथील कार्यक्रमासाठी येणाऱ्यांनी तपोवन मैदानाची डावी बाजू, स्वामी समर्थ मंदिर, कारागृह कर्मचारी निवासस्थाने परिसरात वाहने पार्क करावीत.

Vanchit Bahujan Aaghadi LIVE : ‘वंचित’च्‍या उमेदवारांच्या आज साताऱ्यात मुलाखती

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी वंचित बहुजन आघाडीचे संस्‍थापक ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्‍या देखरेखीखाली सुरू आहे. साताऱ्यातील ८ विधानसभा मतदारसंघातून वंचितकडून लढवू इच्‍छिणाऱ्यांच्‍या मुलाखती बुधवारी (ता. नऊ) सकाळी ११ ते १२ या वेळेत आहेत.

Narendra Modi LIVE : PM मोदी आज महाराष्ट्राला देणार 7,600 कोटींच्या प्रकल्पाची भेट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रात 7,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे, की ते नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणासाठी पायाभरणी करतील, ज्याचा एकूण अंदाजे 7,000 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प आहे. याचा फायदा नागपूर शहर आणि विदर्भाला होणार आहे.

Chhattisgarh News LIVE : विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या

विजापूर (छत्तीसगड) : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या केली. छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात ही घटना घडली. कन्हैया ताटी असे त्यांचे नाव असून पोषणपल्ली गावातील सरकारी शाळेत त्यांचा मृतदेह सापडला. नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Kolhapur News LIVE : मुख्यमंत्री, उपमुख्‍यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर, काय आहे कारण?

Latest Marathi Live Updates 9 October 2024 : अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेली हरियानाच्या आखाड्यातील विधानसभेची ‘दंगल’ अखेर भाजपने जिंकत काँग्रेसला धोबीपछाड दिला. जम्मू-काश्मीरमध्ये मात्र नॅशनल कॉन्फरन्स- काँग्रेस आघाडीची सरशी झाली असून दशकभरानंतर येथे झालेल्या निवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकलेले नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दोघेही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नूतन इमारत उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. इस्राईलच्या हवाई हल्ल्यात दहशतवादी सुहैल हुसेन हुसैनी ठार झाला. त्याच्या मृत्यूने हिज्बुल्ला संघटनेला धक्का बसलाय. साताऱ्यातील ८ विधानसभा मतदारसंघातून वंचितकडून लढवू इच्‍छिणाऱ्यांच्‍या आज मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी #ElectionWithSakal, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.