सेलू येथे क्रीडा व सांस्कृतिक केंद्र आहे. या सांस्कृतिक केंद्राला आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे आमचे कर्तव्य आहे. आमच्या विधिमंडळ सहकारी आमदार मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वात येथील खेळ, खेळाडू यांच्या सर्वांगीण विकासासोबत, सेलू तालुक्यातील क्रीडा सुविधेच्या संदर्भात राहिलेली कामे, क्रीडा संकुल इनडोअर हॉल राहिलेला निधी अंतिम टप्प्यात असून लवकरच वर्ग होईल; सेलूकर खेळाडू , क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक यांनी निश्चिंत राहावे, आम्ही सोबत आहोत, आपली सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा मंत्री तथा पालकमंत्री संजय बनसोडे यांनी मंगळवारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आले असता परभणीत दिली.