Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीचा अर्ज मिस झाला? हरकत नाही, मुदत आणखी वाढलीए! जाणून घ्या नवी तारीख

राज्यातील महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेचा अद्यापपर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे.
cm ladki bahin yojna
cm ladki bahin yojnaesakal
Updated on

मुंबई : राज्यातील महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेचा अद्यापपर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे. पण अद्यापही जर तुम्ही या योजनाच्या लाभापासून वंचित राहिला असाल? तर तुमच्यासाठी आणखी एक संधी सरकारनं उपलब्ध करुन दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. साम टीव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.

cm ladki bahin yojna
Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यात 13 किंवा 14 ऑक्टोबरला लागणार आचारसंहिता? शिवसेनेच्या नेत्याचे संकेत

राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता लाडकी बहीण योजनेला मुदत वाढ देण्यात आली असून १५ ऑक्टोबरपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत पात्र महिलांना या योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येणार आहेत. या योजनेंतर्गत महिन्याला १५०० रुपये शासनाकडून थेट बँकेत जमा केले जातात. Ladki Bahin Yojana Latest News

cm ladki bahin yojna
Ajit Pawar: मंत्रीमंडळ बैठकीतून बाहेर पडण्यामागं नाराजीचं कारण होतं का? अजित पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं

कसा करायचा अर्ज?

या टप्प्यात जे नव्यानं अर्ज सादर करणार आहेत. त्यांनी फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज भरावेत अशी सूचना राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. यापूर्वी हे अर्ज नारीशक्ती दूत नावाच्या मोबाईल अॅपद्वारे भरले जात होते. आत्तापर्यंत या अॅपच्या माध्यमातून सुमारे ८ लाखांहून अधिक अर्ज सादर करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.