मुंबई: रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. रक्षाबंधनाचा धागा हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला राज्यातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून आमच्या बहिणींना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच ही आमच्या बहिणींना भेट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.