बार्शी : एकीकडे मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत, तर दुसरीकडे बार्शीतील मराठा समाजाचे काही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील यांना विचारण्यात आलेल्या अकरा प्रश्नांची उत्तरे न दिल्याने बार्शी येथे त्यांच्याविरोधात अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.