Manoj Jarange : ''तुम्ही जातीयवाद मोडून काढण्यासाठी उभे राहा, मग बघा...'', मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना सल्ला

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी स्टेटमेंट केलं आहे, बीडच्या रॅलीला परवानगी नाकारली नाही.. त्यांचं कौतुकच पण मराठ्यांच्या गोरगरीबांना बीडमध्ये त्रास देऊ नका.. असेच काम करा. मराठ्यांचे कार्यक्रम उधळून लावू नका, मराठ्यांच्या लोकांना मारू नका, आमच्या लोकांना शिवीगाळ करू नका, असं जरांगे म्हणाले.
Manoj Jarange
Manoj Jarangesakal
Updated on

मुंबईः बीडमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला परवानगी देण्यात आलेली असून काही लोक विनाकारण अफवा पसरवीत आहेत, अशी माहिती बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दल ओबीसी नेते कधीही सकारात्मक होणार नाहीत,ओबीसी नेते विरोधात आहेत, त्यात दुमत नाही. आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे, १३ तारखेपर्यंत सरकार सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

Manoj Jarange
Tata Group: टाटा समूहात मोठा बदल! रतन टाटांची ही समिती घेणार सर्व महत्त्वाचे निर्णय, काय आहे प्रकरण?

धनंजय मुंडेंवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी स्टेटमेंट केलं आहे, बीडच्या रॅलीला परवानगी नाकारली नाही.. त्यांचं कौतुकच पण मराठ्यांच्या गोरगरीबांना बीडमध्ये त्रास देऊ नका.. असेच काम करा. मराठ्यांचे कार्यक्रम उधळून लावू नका, मराठ्यांच्या लोकांना मारू नका, आमच्या लोकांना शिवीगाळ करू नका, असं जरांगे म्हणाले.

धनंजय मुंडेंना उद्देशून बोलताना जरांगे पुढे म्हणाले की, तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर मराठे कसे तुम्हाला सोडतील, तुम्ही मराठ्यांना त्रास दिला तर मी मराठ्यांच्या बाजूने उभा राहीन.. तुम्ही जातीयवाद मोडून टाकण्यासाठी उभे राहा, मराठे तुम्हाला कधीही उचलून धरतील, मराठ्यांच्या बाजूने उभे राहा आणि तुम्ही वाईट वागाल तर मराठे तुम्हला सत्तेपासून दूर करतील.

Manoj Jarange
Makeup Tips: काजळ पसरण्याची भीती वाटते? मग या टिप्स फॉलो करा, डोळे दिसतील टपोरे

दरम्यान, मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरु आहे. बीडमध्ये त्यांच्या रॅलीला परवानगी मिळाली नाही,अशा अफवा उठल्या होत्या. मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती देत रॅली होईल आणि त्यासाठी परवानगी मिळाली असल्याचं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.