Manoj Jarange: यंदा मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'येथे' होणार भव्य-दिव्य कार्यक्रम, उद्या बीडमध्ये बैठक

Beed News: बीडमध्ये एकीकडे पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे दरवर्षी दसरा मेळावा होतो, त्यात आता मनोज जरांगे पाटलांचा दुसरा दसरा मेळावा नारायणगड येथे होऊ शकतो. बीड जिल्ह्यात गड आणि गडांभोवती फिरणारं राजकारण, याचं एक वेगळं सामाजिक, अध्यात्मिक आणि राजकीय सूत्र तयार झालं आहे. त्यामुळे गडावरच्या मेळाव्यांकडे सर्वांचच लागून असतं.
Manoj Jarange Patil Shantata Rally
Manoj Jarange Patil Shantata RallyEsakal
Updated on

Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा तीव्र केला आहे. आठवडाभर उपोषण करुनही सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुढची लढाई ही निवडणुकीची असेल, असे स्पष्ट संकेत जरांगे यांनी दिले आहे.

दुसरीकडे यावर्षी मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती येत आहे. रविवारी त्यासंदर्भात एक बैठक होणार आहे. बीडमध्ये असलेल्या नारायणगडाचे विश्वस्त आणि मराठा समाजातील समन्वयकांची एक बैठक संपन्न होणार आहे. त्या बैठकीनंतर दसरा मेळावा जाहीर होईल. श्रीक्षेत्र नारायणगड येथे रविवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे.

Manoj Jarange Patil Shantata Rally
Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार'' राज ठाकरेंनी मांडलं गणित

बीडमध्ये एकीकडे पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे दरवर्षी दसरा मेळावा होतो, त्यात आता मनोज जरांगे पाटलांचा दुसरा दसरा मेळावा नारायणगड येथे होऊ शकतो. बीड जिल्ह्यात गड आणि गडांभोवती फिरणारं राजकारण, याचं एक वेगळं सामाजिक, अध्यात्मिक आणि राजकीय सूत्र तयार झालं आहे. त्यामुळे गडावरच्या मेळाव्यांकडे सर्वांचच लागून असतं.

मराठा आरक्षण

मागच्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी रान उठवलेलं आहे. त्यांच्या रेट्यामुळे सरकारने 'सगेसोयरे' अधिसूचना प्रसिद्ध केली. मात्र त्याचं अद्याप कायद्यात रुपांतर झालं नाही. ओबीसी समाज नाराज होऊ नये म्हणून सरकारने त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील जवळपास सर्वच मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू शकेल.

दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंबंधी सातत्याने मागणी केली आहे. हैदराबाद गॅझेट लागू केल्यास मराठवाड्यातील लाखो मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळून येणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या येणारी अडचण सुटणार आहे. मात्र सरकारने अद्यापही हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.