BJp Vs Jarange Patil: मराठा आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचे द्वेषाचे राजकारण मनोज जरांगे पाटील यांनी सोडून चर्चेला यावे, असे आवाहन भाजपचे राज्य उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे.
मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील ज्या पद्धतीने फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत ते पाहता त्यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याचे दिसून येत आहे. जरांगे यांनी भाजपचे जेष्ठ नेते प्रवीण दरेकर यांना अंतरवल्ली येथे येण्याचे आव्हान दिले आहे. ते स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत. मात्र तुम्ही चर्चेला तयार आहात का, असा प्रश्नही लाड यांनी विचारला आहे.
मराठा तरुणांचा विकास व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक बदल केले. नोकऱ्यांमध्येही मराठा आरक्षण ठेवले, मराठा समाजासाठी योजना आणल्या. मराठा समाजासाठी पोलीस भरती, परदेशी शिक्षण, व्यवसाय यासाठी प्रयत्न केले. तरीही जरांगे पाटील कोणाच्या छत्रीखालून फडणवीस यांचा द्वेष करतात ते पाहिले पाहिजे. असा द्वेष योग्य नाही.
विशिष्ट व्यक्तींना टार्गेट करून राजकारण करत असाल तर तुम्ही उघडपणे राजकारणात या. अन्यथा समाजासाठी काहीतरी करत असाल तर चर्चेतून मार्ग काढा. चर्चेला आम्ही तयार आहोत, पण द्वेषाचे राजकारण करू नका, असेही लाड यांनी बजावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.