Manoj Jarange Patil : लाखोंचा जनसमुदाय तर महीलांकडे नेतृत्व, संभाजीनगरात येणार मराठ्यांचं वादळ

Maratha Reservation : मराठा समाजातर्फे क्रांती चौकाच्या परिसरात जिथे जिथे मराठा बांधव आलेले असतील तिथवर आवाज पोहचेल
Manoj Jarange Patil : लाखोंचा जनसमुदाय तर महीलांकडे नेतृत्व,  संभाजीनगरात येणार मराठ्यांचं वादळ
Manoj Jarange Patil sakal
Updated on

Marathawada: मागील एक महिन्यापासून तयारी सुरू असलेल्या महाशांतता रॅलीच्या समारोपाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, समारोप होणाऱ्या क्रांती चौकात लाखो मराठाबांधवांसाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे.

हा प्रश्‍न लक्षात घेऊन सकल मराठा समाजातर्फे क्रांती चौकाच्या परिसरात जिथे जिथे मराठा बांधव आलेले असतील तिथवर आवाज पोहचेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. असे नियोजन क्रांती चौकाच्या इतिहासात प्रथमच होत आहे.

Manoj Jarange Patil : लाखोंचा जनसमुदाय तर महीलांकडे नेतृत्व,  संभाजीनगरात येणार मराठ्यांचं वादळ
Marathawada Health News: मराठवाड्यासाठी महत्वाची बातमी, आष्टीत होणार उपजिल्हा रुग्णालय!

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी क्रांती चौकाच्या चारही दिशेला भोंगे लावण्यात आले आहेत. मराठाबांधवांचा मुख्य फ्लो सिडकोकडून येणार असल्याने दूध डेअरी चौकापर्यंत आवाज देण्यात येणार आहे.

यासाठी अडीचशे ते तीनशेवर भोंगे लावण्यात येणार आहेत. काही ठिकाणी उंच टॉवर उभे करण्यात आले असून, या टॉवरवर आठ तर काही टॉवरवर १२ भोंगे लावण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्यावरील उंच पोलवरही भोंगे असतील. क्रांती चौकातील उड्डाणपुलावर सर्वच बाजूंनी भोंगे बांधले असून क्रांती चौकाखाली हॅंगिंग साउंड असतील. जागेचा अभाव असल्याने रस्त्यावर दूरदूर थांबलेल्या मराठा बांधवांसाठी साउंडची व्यवस्था करण्यात आली आहे.

असे असेल मुख्य व्यासपीठ

मुख्य व्यासपीठ क्रांती चौकात उभारण्यात आले आहे. हे व्यासपीठ १६ बाय ४० या आकाराचे बनविण्यात आले असून, व्यासपीठाची सहा फूट उंची असेल. व्यासपीठावर शिवरायांचे भव्य स्मारक असेल. शिवरायांना अभिवादन केल्यानंतर जरांगे पाटील आपले विचार मांडतील.

शहरातही अंतरवाली

सराटीतील स्मारक

अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी लाखो मराठ्यांशी संवाद साधला. त्याठिकाणी असलेले शिवरायांचे स्मारक खुलताबादेतील मूर्तिकार नरेंद्रसिंग सोळुंके यांनी तयार केले आहे. हेच स्मारक वाशी, मुंबईच्या पदयात्रेदरम्यान होते. ते स्मारक वसंतराव नाईक चौकात नऊ वाजता आणण्यात येईल. शिवरायांना अभिवादन केल्यानंतर प्रत्यक्ष रॅलीला सुरुवात होईल.

दहा जेसीबीतून फुलांची उधळण

दूधडेअरी चौकातून क्रांती चौकापर्यंत जरांगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी १० जेसीबी उभ्या असतील. याशिवाय प्रत्येक चौकात एक रुग्णवाहिका, एक मोबाइल टॉयलेट व्हॅन आणि एक पाण्याचे टॅंकर उभे असेल. कोणतीही अडचण येणार नाही, असे नियोजन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

चौकाचौकात बॅनर, झेंडे, नाश्त्याची सोय हर्सूल टी पॉइंट ते सिडको सिग्नल आणि सिडको सिग्नल ते क्रांती चौकापर्यंत पाच हजारांहून अधिक झेंडे लावण्यात येतील. सिडको चौक ते बाबा पेट्रोल पंपापर्यंत चौकाचौकात चहापाणी, पुलाव, खिचडी व पाणी बॉटल वाटप करण्यात येईल.

Manoj Jarange Patil : लाखोंचा जनसमुदाय तर महीलांकडे नेतृत्व,  संभाजीनगरात येणार मराठ्यांचं वादळ
Manoj Jarange Patil: आता चूक नाही, विधानसभेत उलटं पाडण्याचा जरांगेंचा इशारा! आठ दिवसात नाव सांगणार; सत्ताधारी टेन्शनमध्ये?

पाचशे महिलांच्या हाती रॅलीची धुरा

रॅलीच्या अग्रभागी पाचशे स्वयंसेवक महिला असणार असून, त्या रॅलीचे नेतृत्व करतील. विधासनभा अधिवेशन सुरू असून, या पंचवार्षिक योजनेचे शेवटचे अधिवेशन आहे. विशेष म्हणजे, १३ जुलै हा अधिवेशनाचा शेवटचा आहे, तोच दिवस सरकारने मराठा समाजाला दिला आहे. जर काही ठोस सरकारने जाहीर केले नाही, तर समारोप रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जायचे, की २८८ आमदार पाडायचे, ही भूमिका जाहीर करणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली.

Manoj Jarange Patil : लाखोंचा जनसमुदाय तर महीलांकडे नेतृत्व,  संभाजीनगरात येणार मराठ्यांचं वादळ
Manoj Jarange Patil: तीनशे बैलगाड्या, शेकडो वाहनं लाखोंचा जनसमूदाय... बीडमध्ये आज मराठ्यांचा एल्गार, वाचा कसं आहे शांतता रॅलीच नियोजन

अशी आहे पार्किंग व्यवस्था

जालन्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी रामनगर कमान, ग्रॅमफोर्थ समोरील पार्किंग

सिल्लोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी शरद टी जवळील खुले मैदान

आंबेडकर चौक-पिसादेवी रोडवरील राममंदिर ट्रस्ट मैदान

मिलिनियम पार्कसमोरील मैदान

कन्नड, वैजापूर व नगरकडून येणाऱ्यांसाठी प्रप्तिकर भवनजवळील फुटबॉल मैदान,

कर्णपुरा पार्किंग, अयोध्यानगरी मैदान

पाचोडकडून येणाऱ्यांसाठी जबिंदा मैदान

पैठणकडून येणाऱ्यांसाठी अयोध्यानगरी मैदान

असे आहेत पर्यायी मार्ग

केब्रिंज चौक - झाल्टा फाटा ते बीड बायपासने महानुभाव आश्रम चौक मार्गाने जाणे व येणे

केब्रिंज चौक ते सावंगी बायपास - हर्सूल टी - हडको कॉर्नर - अण्णा भाऊ साठे चौक - सिटी क्लब, मिल कॉर्नर - बाबा पेट्रोल पंप चौक मार्गाने जातील व येतील.

नगरनाका - लोखंडी पूल - पंचवटी-रेल्वे स्टेशन - महानुभाव आश्रम चौक मार्गे जातील व येतील.

कोकणवाडी चौक - पंचवटी चौक - महावीर चौक मार्गे पुढे जातील व येतील

शहरातील नागरिकांनी जालना रोडऐवजी इतर मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Manoj Jarange Patil : लाखोंचा जनसमुदाय तर महीलांकडे नेतृत्व,  संभाजीनगरात येणार मराठ्यांचं वादळ
Manoj Jarange Patil : ‘भुजबळांचे ऐकून अन्याय करू नका’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com