Manoj Jarange Patil: शिवेंद्र राजेंच्या विरोधात मनोज जरांगे उमेदवार देणार? साताऱ्यात जरांगे नक्की काय म्हणाले?

Shivendra Raje Bhosale: जरांगे पाटील यांनी या काळात अनेकवेळा उपोषण करत सरकारकडून आपल्या काही मागण्या मान्य करून घेतल्या आहेत तर काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत.
Manoj Jarange On Shivendra Raje Bhosale
Manoj Jarange On Shivendra Raje BhosaleEsakal
Updated on

Manoj Jarange Patil Shantata Rally: राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांनी या काळात अनेकवेळा उपोषण करत सरकारकडून आपल्या काही मागण्या मान्य करून घेतल्या आहेत तर काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत.

आशात मराठा समाजाच्या उर्वरित मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी ते शिवेंद्रराजे यांच्या विरोधात उमेदवार देणार आहेत की नाही याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

शिवेंद्रराजेंच्या विरोधात उमेदवार नाही

साताऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद झाली यामध्ये जरांगे पाटील यांनी राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले.

यावेळी एका पत्रकाराने जरांगे यांना विचारले की, ते विधानसभा निवडणुकीत साताऱ्यात शिवेंद्रराजे यांच्या विरोधात उमेदवार देणार आहेत का? यावर जरांगे पाटील यांनी, काय प्रश्न विचारताय म्हणत गादीच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले.

Manoj Jarange On Shivendra Raje Bhosale
Manoj Jarange Patil: माझ्या मागे कोण आहे? मला पैसे कोण पुरवतो? सतत होणाऱ्या आरोपांवर जरांगे पाटील थेटच बोलले

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली काल साताऱ्यात होती. या रॅली दरम्यान जरांगे यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. यावेळी शिवेंद्रराजे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.

या भेटीनंतर शिवेंद्रराजे म्हणाले होते की, जर जरांगे पाटील यांनी सांगितले तर मी, सरकार आणि त्यांच्यामध्ये मध्यस्थी करायला तयार आहे.

यावर जरांगे यांनी स्पष्टीकरण देत मला काहीही हरकत नाही म्हणत आम्हाला कोणीही आरक्षण द्यावे आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ असे म्हटले आहे.

Manoj Jarange On Shivendra Raje Bhosale
Manoj Jarange Patil : सत्ताधाऱ्यांनी त्रास दिल्यास लढा मुंबईला नेऊ; फडणवीस, भुजबळांवर कडाडून हल्ला

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यात शांतता रॅली होणार आहे. पुण्यानंतर ते नगरमध्ये शांतता रॅली घेणार असून नाशिकमधील शांतता रॅलीने त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा टप्पा संपणार आहे.

यापूर्वी जरांगे पाटील यांनी बीड, लातूर, संभाजीनंगरसह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दौरा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.