Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार; या खास दिवशी आंदोलनाला सुरुवात

Manoj Jarange Patil Agitation Maratha Researvation :पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मनोज जरांगे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatileSakal
Updated on

Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. जरांगे १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मनोज जरांगे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. साम टीव्हीने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे पाटीले हे गेल्या अनेक दिवसांपासून आग्रही भूमिका मांडत आहेत. अनेकदा त्यांनी उपोषण देखील केलं आहे. मात्र, अद्याप त्यांची मागणी सरकारकडून मान्य झालेली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.