Manoj jarange on Raj Thackeray: राज ठाकरे सत्तेचा भाग त्यांना किंमत देऊ नका, मनोज जरांगे संतापले! काय दिला इशारा?

Manoj jarange Patil: मराठा समाजाने राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. धाराशीव येथे राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले होते. या प्रकरणावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj jarange and raj thackeray
Manoj jarange and raj thackerayesakal
Updated on

देशभरात खासगीकरण वाढत असून, खासगी संस्थांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्या मुलांना आरक्षण मिळणार आहे का, किती ठिकाणी आरक्षण मिळेल, याचा अभ्यास करायला हवा. महाराष्ट्रात सर्वकाही मुबलक असल्याने इथे आरक्षणाची गरज नाही, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल सोलापुरात बोलताना स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज ठाकरे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.

मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया-

मराठा समाजाने राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. धाराशीव येथे राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले होते. या प्रकरणावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे यांचा संताप-

"आरक्षण कशासाठी लागतं हे माहिती नाही, आंदोलकांनी कुणालाही किंमत देऊ नये," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. "राज ठाकरे यांना भेटायची काय गरज आहे. हे गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळणारे लोकं आहेत. राज ठाकरे देखील सत्तेचा भाग आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे आंदोलन कशाला करायचे. त्यांना कशाला भेटता. आपला मराठा लय मोठा आहे असं कुणालाही विचारायला जाऊ नका. मराठ्यांना माझी विनंती आहे कुणालाही किंमत देऊ नका. सगळ्यांनी शांत राहावं, संयम ठेवा. पण माझ्या मराठ्याच्या लेकरांना त्रास होता कामा नये," असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Manoj jarange and raj thackeray
Raj Thackeray : महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही,राज ठाकरे ; विधानसभेच्या २२५ जागा मनसे लढविणार असल्याचे स्पष्टीकरण

राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये गोंधळ-

धाराशिवमध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला होता. आंदोलकांची मागणी आहे की, राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. त्यामुळे नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात, अशी आंदोलकांची मागणी आहे.

Manoj jarange and raj thackeray
Sheikh Hasina Plane Safety: शेख हसीनाच्या भारत प्रवेशापूर्वी 2 राफेल होते अलर्टवर ... असा ठरवला हिंडन एअरबेसचा मार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.