Manoj Jarange : "विधानसभेत आपले 40-50 लोक पाहिजेत"; जरांगेंकडून विधानसभेची तयारी सुरु, म्हणाले, आता गेम...

आंतरवली सराटी इथं उपोषणादरम्यान त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला
Manoj Jarange Maratha Reservation
Manoj Jarange Maratha Reservationesakal
Updated on

आंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे सध्या आंतरवली सराटी इथं उपोषण करत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विधानसभेची तयारी सुरु करणार असल्याचे संकेत दिले. विधानसभेत आपले ४० ते ५० प्रतिनिधी पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच आता आपण विद्यमान आमदारांचे गेम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Manoj Jarange Maratha Reservation
Kathmandu Plane Crash: काठमांडूत मोठा विमान अपघात! 19 जणांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; 15 जणांचा मृत्यू

जरांगे म्हणाले, "आपल्याला जर काही अडचणी आल्या तर विधानसभेत बोलायला कोणीच नाहीत. जसं ग्रामपंचायतमध्ये आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो. तसं शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला विधानसभेत नाही. पिकविमा, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव, मराठा आरक्षण, मुस्लीम आरक्षण, दलित, बारा बलुतेदार, बंजारा, धनगर बांधवांचे प्रश्न मांडायला कोणी नाही. लोकांनाच सांगावं लागतं करतो का एवढं काम? या आमदाराच्या मनात आलं तर तो करतो काम नाहीतर नाही"

Manoj Jarange Maratha Reservation
AMU Firing: अलिगढ मुस्लिम विद्यापीठात फायरिंग! दोन कर्मचारी गोळी लागल्यानं जखमी

त्यामुळं आपले ४० ते ५० लोक पाहिजेत तिथं, ते विधानसभाच बंद पाडतील. त्यांनीच कोणते कोणते मतदारसंघ लढायचेत हे आता ठरवायला पाहिजे. नुसतं इथं पडून राहण्यापेक्षा सरकारमध्ये आपलेच लोक घालू ना? आजपासून मी कोणाच्याच टीकेला उत्तर देणार नाही. आता नुसते गेम लावणार आहे. भाजपतील जी मराठ्यांची माकडं आहेत आणि ते जे बरळत आहेत त्यांना बरळू द्या त्यांना मी उत्तरं देणार नाही. आता मी कोणाला कसं पाडायचं त्याचं नियोजन करणार आहे, असा इशाराही यावेळी मनोज जरांगे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.