Manoj Jarange : ''सरकारने मला...'' शांतता रॅलीत मनोज जरांगेंना अश्रू अनावर; सांगितला १३ तारखेनंतरचा प्लॅन

''माझी ओबीसी आणि मराठा बांधवांना विनंती आहे की, कृपया एकमेकांच्या अंगावर जाऊ नका. १३ तारखेनंतर निर्णय झाला नाही तर बहुतेक आपली बैठक मुंबईत असेल.'' असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.
CM Eknath Shinde Manoj Jarange Patil
CM Eknath Shinde Manoj Jarange Patilesakal
Updated on

Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये मराठा-ओबीसी असा संघर्ष उफाळून येऊ लागला आहे. त्यामुळेच मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. शनिवारी जरांगे पाटलांची शांतता रॅली हिंगोलीत झाली. हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी जरांगे पाटलांना समर्थन दिलं.

रॅलीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कुणबी ही मराठ्यांची पोटजात आहे. मग आरक्षण का नाही? आतापर्यंत ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत, सरकारने लेखी दिलंय.. तरीपण आम्हाला आरक्षण देत नाहीत. काल मला कैकाडी समाजाचे पथक भेटायला आले होते, त्यांनी सांगितले आमची एकच जात आहे कैकाडी. पण विदर्भात ही जात एससीमध्ये आहे, खान्देशमध्ये एसटीमध्ये आहे आणि इतर महाराष्ट्रात ओबीसीत आहे.. मंडल आयोगाच्या चुका त्यांनी काढल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं.

CM Eknath Shinde Manoj Jarange Patil
हिटमॅनला पाहून नीता अंबानी भावूक, मिठी मारून लागल्या रडू; मुलाच्या संगीत सोहळ्यातील Video Viral

सरकारला इशारा देत जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने १३ तारखेच्या आत आरक्षण द्यावे, अन्यथा आम्ही घेतलेला निर्णय झेपणार नाही. सरकारला छगन भुजबळ लागत असेल तर मग पर्याय नाही, छगन भुजबळ यांनी टोळी तयार केली आहे.. उद्या मराठ्यांचा संयम सुटला तर विधानसभेत झटका बसेल. छगन भुजबळ खोडसाळ माणूस आहे. भुजबळ यांनी आमच्या गावात हाकेंना आणून बसवले आणि म्हणतात जातीय तेढ निर्माण करू नका.

''माझी ओबीसी आणि मराठा बांधवांना विनंती आहे की, कृपया एकमेकांच्या अंगावर जाऊ नका. १३ तारखेनंतर निर्णय झाला नाही तर बहुतेक आपली बैठक मुंबईत असेल.'' असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.

''ड्रोन माझ्या जवळ येत नाही अन्यथा एका दगडात पडलं असतं. माझं कुटुंब उघड्यावर पडलं पण मी समाजाच्या सोबत आहे.'' असं म्हणताना जरांगे पाटील भावनिक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले होते.

ते म्हणाले की, सरकारने मला एकटं पाडायचं ठरवलं आहे, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा.. मी यांना मॅनेज होत नाही, मी कणखर मराठा आहे.. माझ्या सोबतचे लोक फोडत आहेत, मला बदनाम करणे सुरू आहे, माझी एकच चूक आहे, मी खरं बोलतो आणि ते इतरांना रुचत नाही, असं म्हणत जरांगे पाटलांनी १३ तारखेनंतर मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा सूचक इशरा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.