Manoj Jarange Patil: आमचा एकच विरोधक... चक्क जरांगे यांनी केलं राज्य सरकारच कौतुक, वाघनखांच्या दर्शनाला जाणार

Manoj Jarange On Wagh Nakh And Maratha Reservation : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी भारतात आणण्यात आली आहेत.
Manoj Jarange On Wagh Nakh And Maratha Reservation
Manoj Jarange On Wagh Nakh And Maratha Reservation
Updated on

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. यादरम्यान लंडनहून भारतात आणण्यात आलेल्या वाघनखांच्या मुद्द्यावर जरांगे यांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे. शिवरायांची वाघनखं भारतात आणली हे चांगलं काम असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

जरांगेंकडून राज्य सरकारचं कौतुक

छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी भारतात आणण्यात आली आहेत. ही वाघनखं सध्या सातारा येतील संग्राहलयात ठेवण्यात आली आहेत. यादरम्यान राज्य सरकारने वाघ नख भारतात आणली हे चांगल काम आहे असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच कौतुक केले आहे. यासोबतच मी देखील वाघनख पाहण्यासाठी जाईल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते.

Manoj Jarange On Wagh Nakh And Maratha Reservation
Video : औरंगजेब की अफजल खान? वाघनखांवर बोलताना भरकटले उदयनराजे, भाषणात केली 'ही' चूक

उपोषण थांबणार नाहीच

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आमचा मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास आहे, ते काय करायचं ते करतील. तसेच उद्याच उपोषण होणारच असं सांगत उद्याच्या उपोषणाला प्रशासन किंवा शासन भेटीला आले नाही म्हणून उपोषण थांबणार असं होणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलय. उद्या सकाळी 10 वाजता कठोर आमरण उपोषण सुरू होणार असून सरकारने आम्ही सांगितलेल्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी देखील जरांगे यांनी यावेळी केली.

Manoj Jarange On Wagh Nakh And Maratha Reservation
Ajit Pawar : गडकिल्ल्यांवर दारू पिऊन जाल तर खबरदार! वाघनखांच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांनी केली नव्या कायद्याची घोषणा

आमचा एकच विरोधक...

छगन भुजबळ एक छगन भुजबळ, आमचा दुसरा विरोधक नाही असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ यांनी धनगर आरक्षणाबाबत बोलावं असं म्हणत जे छगन भुजबळच्या नादी लागत नाही, ते पुढे जातात असा टोला जरांगे यांनी लगावला. महादेव जानकर साहेब छगन भुजबळ यांच्या नादी लागले नाहीत म्हणून ते आज पुढे गेले असेही जरांगे म्हणालेत. नरेटीवचा विषय येत नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सगळे गुन्हे मागे घ्यायला सांगा अशी मागणी जरांगे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.