मुंबई : मराठा समाजाला कुणबी दाखले मिळवताना अनेक अडचणी येत होत्या, या अडचणी आता कमी होणार आहेत, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. शिंदे समितीनं राज्य सरकारला सादर केलेल्या ताज्या अहवालावर सह्याद्री अतिथीगृह इथं पाच तास बैठक पार पडली. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "शिंदे समितीच्या अहवालात त्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यातला सोपेपणा कसा निर्माण करता येईल? अशा प्रकारच्या काही सूचना केल्या आहेत. त्या मंत्रिमंडळानं मान्य केल्या आहेत, त्यावर आता जीआर निघेल.
समितीनं टप्प्याटप्यावर खूप गोष्टी सोप्या केल्या आहेत. जसं की यापूर्वी १० पुराव्यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळायचं पण आता ही पुराव्यांची संख्याच ४२ करुन टाकली आहे. हे ४२ पुरावे समितीनं वेबसाईटवर टाकून दिले आहेत. यामध्ये जेलमधील नोंदी, पोलीस स्टेशनमधील नोंदींचा समावेश आहे.
यातून सर्वसाधारण मराठा व्यक्ती देखील आता वेबसाईटवरील या नोंदी बघून यातील कुठला पुरावा आपल्याकडं सापडतोय का? हे बघू शकतो. यापूर्वी १० पुराव्यांमध्ये ती सापडत नव्हती पण आता ४२ पुराव्यांमध्ये ती सापडते. त्यामुळं आता मराठा समाज धावतपळत जाऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकतो" latest news on maratha reservation and kunabi certificate
हैदराबाद, सातारा किंवा त्र्यंबकेश्वर गॅझेटमध्ये किंवा कुठल्याही गॅझेटमधील नोंदी या एक गठ्ठा आहेत. त्यामुळं अशा एक गठ्ठा नोंदी असल्यानं अशा समुहाला तुम्हाला कन्व्हर्ट करता येत नाही. म्हणजेच मराठा ते कुणबी असा बदल करता येत नाही. १८८२ मध्ये मराठा समाज जर कुणबी होता पण १९९२ पासून तो पुन्हा मराठा असं लिहायला लागला. त्यावेळी काही चळवळी झाल्या त्यानंतर कुणबी या नोंदी मराठा अशा झाल्या. त्यानंतर पुढे मराठा अशाच लावल्या गेल्या.
त्यामुळं १८९२ पासूनची वैयक्तिक कुणबी अशी नोंद ज्यांची सापडते आहे त्यांना तात्काळ प्रमाणपत्रे देण्यात येतील, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितलं. तसंच शिंदे संमितीच्या स्थापनेनंतर आत्तापर्यंत १ लाख ७६ कुणबी नोंदी सापडल्या आहेत, असंही यावेळी चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.