Manoj Jarange: नऊ दिवसांनंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; मराठा समाजाला केलं 'हे' आवाहन

Manoj Jarange patil on Devendra Fadnavis after hunger strike: फडणवीसांचं नाव घेऊन जरांगे म्हणाले की, फडणवीस साहेब मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा. मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीसांच्या जाळ्यात अडकू नये.. तुम्हाला संधी आहे आमचं ओबीसीमधलं आरक्षण आमचं आम्हाला द्या.
Manoj Jarange Maratha Reservation Aarakshan Hunger strike
Manoj Jarange Maratha Reservation Aarakshan Hunger strike
Updated on

Maratha Reservation: मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ९ दिवस उपोषण केल्यानंतर बुधवारी उपोषण मागे घेतलं. मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत, असं जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारालाही इशारा दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, माझं उपोषण सुरु असताना लोकांचा त्रास मला सहन होत नाहीये, कोर्टाचा मी सन्मान करतो.. उपोषण करुनही आता काही फायदा नाही. आता उपोषण स्थगित करत आहोत.

''सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर नाही देऊ द्या, आपण सत्तेत जाऊ, आपले लोक सत्तेत गेले पाहिजेत. आपण सरकारला संधी दिली होती, पण आता त्यांनी वेळ चुकवली आहे. समाजाच्या महिला, मुलं, श्रीक्षेत्र नारायणगड हे सकारपेक्षा मोठे आहेत. त्यामुळे उपोषण स्थगित करत आहे.''

मनोज जरांगे पुढे म्हणाले, सरकार मला बदनाम करु शकतं, पण ते मला मॅनेज करु शकत नाहीत. उपोषण सुटलं की मराठा समाजाला सांगतो, दवाखान्यात कुणी येऊ नका. मी उपचार घेऊन पुन्हा अंतरवालीमध्ये येतो, तेव्हाच आपण भेटूया. डॉक्टरचाच दवाखाना असून त्याला म्हणतेत बाहेर हो. आता माझं शरीर संपलं आहे, चार-पाच दिवस आरामाची गरज आहे.

Manoj Jarange Maratha Reservation Aarakshan Hunger strike
Zerodha Scam: झिरोधामध्ये सर्वात मोठा स्टॉक ब्रोकिंग घोटाळा; 15 लोकांनी केली करोडोंची लूट, 432 बनावट खाती

फडणवीसांचं नाव घेऊन जरांगे म्हणाले की, फडणवीस साहेब मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा. मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीसांच्या जाळ्यात अडकू नये.. तुम्हाला संधी आहे आमचं ओबीसीमधलं आरक्षण आमचं आम्हाला द्या. आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मराठ्यांना खचून जायची गरज नाही. सरकारने आपल्या लेकरांशी धोका केला तर तुम्ही तुमच्या मुलाशी धोका करु नका.. या सरकारला धडा शिकवा.

काय म्हणाले मनोज जरांगे?

  • मराठ्यांनो भोळे राहू नका

  • मी जातीयवादी आहे, अशी टीका केली जाते. मराठ्यांच्या विरोधात माधव पॅटर्न कुणी आणला होता?

  • जातीयवाद मी आलो म्हणून झाला का?

  • यापूर्वी जातीयवाद नव्हता का. पन्नास-शंभर वर्षांपूर्वी जातीयवाद नव्हता का?

  • जातीयवाद काय असतो हे आता मी दाखवतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.