Maratha Reservation: एक लाख फी भरू शकत नाही.. काय करू? जरांगेच्या भेटीला आलेल्या तरुणीला व्यथा मांडताना अश्रू अनावर

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणस्थळी एका मुलीला अश्रू अनावर झाले. शैक्षणिक प्रवेशासाठी आई-वडील फी भरु शकत नाहीत, त्यामुळे तिने जरांगेंसमोर कैफियत मांडली.

ती म्हणाली की, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आताच करायची होती का? त्याच्यामुळे आम्हाला कास्ट सर्टिफिकेट निघत नाहीये.. आमची खूप परवड होऊ लागली आहे. आमच्याकडे वेळ कमी आहे. दहा दिवसात कसं सर्टिफिकेट मिळायचं? पावतीवर रजिस्ट्रेशन करायला सांगत आहे, आम्हाला पावती पण मिळत नाही. आमचे आई-पप्पा एक लाख फीस देऊ शकत नाहीत, असं म्हणत विद्यार्थीनीला अश्रू अनावर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.