Maratha Reservation: ''मनोज जरांगे अन् देवेंद्र फडणवीस यांच्यातलं भांडण नकली'' प्रकाश आंबेडकरांचा दावा, पुरावाही दिला

Manoj Jarange: ''ओबीसी समाज कुठेही जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत नाहीये. परंतु यामध्ये राजकारण होत आहे. हे राजकारण समजून घ्या.. जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण नकली आहे. जर भाजपाने ओबीसीविरोधात भूमिका घेतली असती आणि जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना विरोध केला असता तरच हे भांडण खरं असतं. अन्यथा हे नकली भांडण आहे.''
Manoj Jarange on Prakash Ambedkar Vanchit
Manoj Jarange on Prakash Ambedkar Vanchit esakal
Updated on

Prakash Ambedkar News: राज्यामध्ये मराठा आरक्षणावरुन वादंग उभं राहिलं आहे. एकीकडे मराठा-ओबीसी असा संघर्ष उंबरठ्यावर असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आहेत. त्यातच आता कायम अनोखी विधानं करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आणखी एक वेगळं विधान केलं आहे.

पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकच असल्याचं म्हटलं आहे. दोघांचेही दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, असंही आंबेडकर म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ओबीसी समाज कुठेही जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत नाहीये. परंतु यामध्ये राजकारण होत आहे. हे राजकारण समजून घ्या.. जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण नकली आहे. जर भाजपाने ओबीसीविरोधात भूमिका घेतली असती आणि जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना विरोध केला असता तरच हे भांडण खरं असतं. अन्यथा हे नकली भांडण आहे.

Manoj Jarange on Prakash Ambedkar Vanchit
Major Accident In Kashmir: काश्मीरमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पाच मुलांसह ८ जणांचा मृत्यू

आंबेडकर पुढे म्हणाले की, राजकारण समजून घेण्याची गरज आहे. जरांगे-फडणवीस यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. आपण जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला नाहीच. परंतु त्यांनी स्वतःला फसवून घेऊ नये, असं मी म्हटलं.

Manoj Jarange on Prakash Ambedkar Vanchit
Jalgaon News : लहान मुलांच्या हृदयाला छिद्र, चिंता नको; शहरातील 94 बालकांची मोफत 2 डी इको तपासणी

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला पाठिंबा दिलेला होता आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आंबेडकर समर्थन देत होते. मात्र मागच्या काही दिवसांपासून आंबेडकरांचा सूर बदलला असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेला नेमकं काय होईल, याचं गणित सध्या लावणं अवघड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.