सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि सोलापूर जिल्ह्यातील कोंडी येथे जोडे मारण्यात आले. संभाजी ब्रिगेडने तर बार्शीत येऊन आमदार राजेंद्र राऊत यांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे.