राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळणार असून योजनेत सध्या जुलै आणि ऑगस्टच्या टप्प्यात 1 कोटी 59 लाख लाभार्थींना 4,787 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.