Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना एकदाच येणार 3 हजार, देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana August, September Installments: राज्यात महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
Ladki Bahin Yojana August, September Installments Devendra Fadnavis
Ladki Bahin Yojana August, September Installments Devendra FadnavisEsakal
Updated on

राज्यात महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. आतापर्यंत लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्र तीन हजार रुपये मिळाले आहेत.

कधी मिळणार सप्टेंबरचा हप्ता?

आता ज्या महिलांना अर्ज भरण्यास विलंब झाला होता, त्या महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र तीन हजार रुपये या महिन्याच्या शेवटी मिळणार आहेत. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा महाराष्ट्र शासनाचा एक विशेष उपक्रम आहे, ज्याचा उद्देश राज्यातील महिला आणि मुलींना सक्षम करणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे.

या योजनेंतर्गत, राज्य सरकार 21 वर्षांच्या पुढील मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य करते, जेणेकरून त्यांना त्यांचे शिक्षण आणि करिअरची उद्दिष्टे साध्य करता येतील. महिलांना त्यांच्या सामान्य गरजा भागवता येतील. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 15,00 रुपये दिले जातात.

Ladki Bahin Yojana August, September Installments Devendra Fadnavis
Prakash Ambedkar: फडणवीसांविरुद्ध ‘वंचित’च्या या नेत्याला मिळाली उमेदवारी, ११ जणांची यादी जाहीर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी पात्रता

या योजनेचा लाभ केवळ त्या महिलांनाच मिळणार आहे ज्यांनी शासनाने विहित केलेल्या पात्रता अटींची पूर्तता केली आहे.

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ महिलांनाच दिला जाईल.

  • या योजनेचा लाभ फक्त त्या महिलांनाच मिळेल ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

  • 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

  • जर महिलेच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा कर भरत असेल तर ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

  • गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेचा विशेष लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana August, September Installments Devendra Fadnavis
OBC Reservation: मुख्यमंत्र्यांचे ओबीसींकडे नेहमी दुर्लक्ष, लक्ष्मण हाकेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.