Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले म्हणून त्यांच्याविरुद्धच्या इडीच्या केस बंद झालेल्या नाहीत. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता, म्हणूनच सत्ता स्थापन होऊ शकली होती.
पुणे - भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत येऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. पण १४९ चे मताधिक्य असणारे तकलादू फायदेशीर नव्हते, म्हणून अजित पवारांना सोबत घेतले. त्यांना सोबत घेतले नसते तर लाडकी बहिण योजनेसारखे धडाकेबाज निर्णय घेता आले नसते.