laxman hake: मद्य प्राशन केलेल्या लक्ष्मण हाके यांना पोलिसांनीच लिंबू पाणी दिलं? आरोपामुळे खळबळ

Laxman hake Drunk Video: जरांगे आमचे नेते आहेत. एक खासदार, एक ओबीसी आमदार या प्रकरणाच्या मागे आहेत. एकतर्फी न्याय होतोय. गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
laxman hake
laxman hakeesakal
Updated on

मुंबई- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना ठाण्यात पोलिसांनी लिंबू पाणी दिलं, असा गंभीर आरोप मराठा समाजातील बांधवांनी आज पत्रकार परिषद घेत थेट पोलिसांवरच आरोप केला आहे. हाके यांनी मद्य प्राशन करून शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा समाजातील तरुणांनी केला होता.

हाके म्हणतात आम्हाला पाठवलं गेलं पण आम्हाला कोणीही पाठवलेले नव्हते. हाके पत्रकार परिषदेत सुरुवातीला म्हणतात. वॉकिंगला गेलो, नंतर शेवटी म्हणतात मित्राच्या घरी जेवायला गेलो. हाकेंना ब्लॕक टी, लिंबू, पँण्डी गोळी पोलिसांनी दिली असा आरोप मराठा समाजातील तरुणांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

laxman hake
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याचा निषेध; OBC कार्यकर्त्यांचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको...

जरांगे आमचे नेते आहेत. एक खासदार, एक ओबीसी आमदार या प्रकरणाच्या मागे आहेत. एकतर्फी न्याय होतोय. गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सदर प्रकरण चांगलंच तापताना दिसत आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

laxman hake
Laxman Hake यांनी मद्यप्राशन केल्याचा Video Viral, मराठा आक्रमक | Maratha vs OBC Reservation

पुण्यातील कोंढवा परिसरात लक्ष्मण हाके यांनी मद्य प्राशन करून मराठा तरुणांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली होती. त्यांचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. प्राथमिक अहवालात लक्ष्मण हाके यांनी मद्य प्राशन केले नसल्याची माहिती समोर आली होती.

काही मराठा तरुणांनी लक्ष्मण हाके यांना घेरलं होतं. लक्ष्मण हाके यांनी याप्रकरणी २० ते २५ मराठा तरुणांवर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तरुणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरण चांगलेच गाजलं होते. मला बदनाम करण्यासाठी मराठा तरुणांचा हा डाव आहे, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला होता. हाके यांनी संभाजीराजे यांच्यावर देखील टीका केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.