वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टाडा कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. राज ठाकरेंनी शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यामुळे मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रणाणात आहे आणि मग ते शहरात आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यावर सरकारचा इतका पैसा खर्च होतो की शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे पैसा नाहीये, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते.
राज ठाकरेंच्या या वक्तव्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, अशा व्यक्तींवर सरळ टाडा-पोटा लागला पाहिजे, हे ब्रेक अप द नेशन... सरकारने मागे पुढे न पाहाता सरळ आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. महाराष्ट्रातील माणूस यूपी, ओडिसा, पश्चिम बंगालमध्ये आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे. गुजरातमध्ये देखील आहे. त्यांचं काय करायचं? त्यामुळे हे वक्तव्य समाज दुभंगण्याचं वक्तव्य आहेत. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे UAPA आणि नॅशनल सेक्युरिटी अॅक्ट लागला पाहिजे. सरकारने हिंमत दाखवावी. उद्या उठाव झाला आणि त्या राज्यातील लोकांनी तुम जाव, आणि इथं आपण तुम जाव म्हटलं तर काय होणारेय? गोंधळ उडेल असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल देखील मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस असल्याचे आंबेडकर म्हणाले आहेत. जर त्यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे यावर शिक्कामोर्तब होईल असे आंबेडकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.