Prakash Ambedkar : जरांगे पाटलांच्या निवडणूक लढवण्याच्या विधानावरुन प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; म्हणाले त्यांनी...

Manoj Jarange : जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी तयारी केली पाहिजे असं आंबेडकर म्हणाले आहेत. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल आहे
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar esakal
Updated on

Manoj Jarange : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शनिवारापासून पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेची तयारीबद्दल भाष्य केलं. त्यावरुन त्यांना प्रकाश आंबेडकरांनी सल्ला दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हिंगोलीच्या कळमनुरी शहरात प्रकाश आंबेडकर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे.

Prakash Ambedkar
Success Story: शिक्षणाची जिद्द असलेली ठाण्याची नूरजहाँ बनली एकलव्य! संर्घष वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी तयारी केली पाहिजे असं आंबेडकर म्हणाले आहेत. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल आहे

तिसऱ्या आघाडीबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. अजित पवार हे जोपर्यंत भाजपसोबत आहे तोपर्यंत तिसरी आघाडी शक्य नसल्याचं आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar
Shraddha Kapoor : अखेर लग्नाच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरचं उत्तर, म्हणते "जेव्हा नवरी बनायचंय..."

मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना दिलेल्या शिवीगाळ प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, पुणेरी भाषा आणि ग्रामीण भाषेत फरक आहे.. असं म्हणत आंबेडकर यांनी यावर बोलणे टाळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.