Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार'' राज ठाकरेंनी मांडलं गणित

Raj Thackeray: ‘‘फुकट कुणी काही मागायला स्वतःहून येत नाही. शेतकऱ्यांनी कधीच मोफत वीज द्या, अशी मागणी करीत मोर्चा काढलेला नाही. सत्तेत येण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी दिलेले हे आमिष आहे.’’
Raj Thackeray
Raj ThackerayESakal
Updated on

अमरावतीः राज्य सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची तिजोरी येत्या जानेवारीपर्यंत रिकामी होणार आहे. त्याचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार असून त्यांच्या पगाराचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याचा थेट इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी येथे दिला.

विदर्भातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी ते कालपासून अमरावतीत मुक्कामी होते. पहिल्या दिवशी त्यांनी पश्चिम विदर्भाचा आढावा घेतला. आज त्यांची पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. बैठकीला जाण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘फुकट कुणी काही मागायला स्वतःहून येत नाही. शेतकऱ्यांनी कधीच मोफत वीज द्या, अशी मागणी करीत मोर्चा काढलेला नाही. सत्तेत येण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी दिलेले हे आमिष आहे.’’

Raj Thackeray
IPL Retention: ५ खेळाडू कायम राखण्याची फ्रँचायझीला मोजावी लागेल भारी रक्कम; थेट पॉकेटमधून ७५ कोटी कापणार

राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. ते म्हणाले, अशा फुकट योजनांऐवजी महिला सक्षम करण्यासाठी रोजगार उपलब्ध करणे, त्यांना उद्योगधंद्यांसाठी भांडवल व प्रशिक्षण देणे आवश्यक असून राज्य सरकार त्याऐवजी अशा योजना लागू करून तिजोरी रीती करीत आहे. या योजनेसाठी लागणारा निधी बघता जानेवारीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठीही राज्य सरकारकडे पैसे शिल्लक राहणार नाहीत. राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारी ही योजना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.