Ladki Bahin Yojna: ''आम्हाला हे खटकलंय...'' लाडकी बहीण योजनेवरुन शंभूराज देसाईंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुनावलं

Shambhuraj Desai News: बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही एक बॅनर झळकला होता. त्यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, बारामतीतील बॅनर मला माहित नाही. साताऱ्यातदेखील आम्ही तिघांचे फोटो लावले होते. असा दूजाभाव आम्ही केला नाही, पुढेही नाही करणार. दुसऱ्या घटक पक्षांनी समजूतदारी पाळावी.. गुलाबी रंग भगव्याच्या जवळचा आहे. हळूहळू तो रंग येतो आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisakal
Updated on

Ajit Pawar News: राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरुन सत्तापक्षातल्या नेत्यांमध्ये श्रेयवाद सुरु झाला आहे. अजित पवारांच्या कॅम्पेनमध्ये सातत्याने स्वतःला प्रोजेक्ट करण्यात येतं आहे. विशेष म्हणजे या योजनेचं नाव 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' असं असताना त्यांच्याकडून केवळ 'माझी लाडकी बहीण योजना' असा शब्दप्रयोग केला जातोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.