Sharad Pawar on Manoj Jarange: जरांगेंच्या आंदोलनामागे खरंच शरद पवारांचा हात आहे का? पवारांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले...

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या वर्षभरापासून सातत्यानं आंदोलनाचं हत्यार उपसत आहेत.
Manoj Jarange Patil: पवारांच्या 'या' शिलेदाराने घेतली जरांगेंची भेट; आरक्षणासाठी उपोषणाला दिले समर्थन
Manoj Jarange Patil Sharad pawar sakal
Updated on

मुंबई : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या वर्षभरापासून सातत्यानं आंदोलनाचं हत्यार उपसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेल्या उपोषणामुळं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडवरही पुन्हा त्यांनी उपोषण केलं. यामुळं सरकारी पक्षांकडून जरांगेंना उपोषण करण्याचा सल्ला शरद पवारच देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाला आज खुद्द शरद पवारांनीच उत्तर दिलं.

Manoj Jarange Patil: पवारांच्या 'या' शिलेदाराने घेतली जरांगेंची भेट; आरक्षणासाठी उपोषणाला दिले समर्थन
Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा प्रश्नावर शरद पवारांनी सुचवला तोडगा! मुख्यमंत्र्यांनाही दिला 'हा' सल्ला

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी नुकताच शरद पवारांवर आरोप केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, "आम्ही हे वारंवार सांगत आहोत की जरांगे ज्या प्रकारची भाषा ऐकत आहेत त्यावरुन हे दिसतंय की यामध्ये शरद पवारांचा हात असल्याचा वास येत आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारनं त्यांना आरक्षण देण्यासाठी मदत केलेली नाही, याबाबत जरांगे बोलत नाहीएत.

राज्यात पाच वेळा काँग्रेसचं सरकार राहिलं यावेळी चार ते पाच मराठा समाजाचे मुख्यमंत्री राहिले. त्यात शरद पवारही होते, ते राज्याच्या राजकारणात अग्रेसर नेते आहेत. जेव्हा मराठा आरक्षणविषयक विशेष सर्वपक्षीय बैठक आयोजित केली जाते तेव्हा ते त्या बैठकीला येत नाहीत. त्यामुळं अशा नेत्याला जर शरद पवार प्रश्न विचारु शकत नसतील तर याचा अर्थ या आरक्षणाच्या राजकारणामागे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा हात आहे हा माझा आरोप आहे"

Manoj Jarange Patil: पवारांच्या 'या' शिलेदाराने घेतली जरांगेंची भेट; आरक्षणासाठी उपोषणाला दिले समर्थन
Mahayuti CM Candidates: "महायुतीत सात जण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार"; संजय राऊतांचा मोठा दावा

शरद पवारांनी दिलं उत्तर

जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आल्याचा प्रश्न पत्रकार परिषदेत शरद पवारांना विचारला यावर शरद पवार म्हणाले, "महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की, कुठं काहीही झालं की त्याचा संबंध शरद पवारांशी जोडला जातो. लातूरला भूकंप झाला तर त्याच्या मागे शरद पवारच होते अशी चर्चा त्यावेळी होती, कदाचित तुम्हाला माहिती नसेल. पण तुमच्या वरिष्ठांना हे कदाचित माहिती असेल"

Manoj Jarange Patil: पवारांच्या 'या' शिलेदाराने घेतली जरांगेंची भेट; आरक्षणासाठी उपोषणाला दिले समर्थन
Video : जखमी वडिलांसाठी मुलगा बनला 'श्रावण बाळ'! खाटेची केली 'कावड' अन् नेलं रुग्णालयात

मराठा आरक्षणाबाबत पवारांच्या पक्षाची भूमिका काय?

ओबीसींतून मराठ्यांना आरक्षण द्यावं किंवा नाही हेच सध्याच्या आरक्षण मुद्यांचं मूळ आहे. याबाबत शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "जरांगेंनी हे देखील सांगितलं होतं की, शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाहीतरी आमचा आग्रह राहणार नाही. त्यामुळं हा प्रश्न सुटावा हा आमचा आग्रह आहे.

तसंच ज्या ज्या घटकातून हा प्रश्न सुटणार असेल तर त्या सर्वांना बोलवून प्रश्न सोडवावा असं आम्हाला वाटतं. माझ्या पक्षाची भूमिका ही सुसंवादाची आणि चर्चेची असून जो काही मार्ग असेल त्याला अनुकुलतेची आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.