Ladki Bahin Yojana: खुशखबर! 'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; पैसे आले की नाही 'असे' करा चेक

Latest Update On third installment of Majhi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गप महिना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana form status online
Majhi Ladki Bahin Yojana form status onlineesakal
Updated on

राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गप महिना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. थोड्याच दिवसात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेचा पुढचा म्हणजेच तिसरा हप्ता २९ सप्टेंबर रोजी वाटप केला जाणार आहे. दरम्यान महिलांच्या खात्यात या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.

या योजनेच्या लाभासाठी ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली आहे त्यांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा होत आहेत. तर ज्या महिलांनी पहिल्या टप्प्यात अर्ज दाखल केले होते त्यांच्या खात्यात १५०० रुपये लवकरच जमा होतील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल दोन लाख ३१ हजार २९४ नवीन महिलांनी अर्ज केले आहेत. पण महिलांचे बँक खाते आणि आधार नंबर लिंक नसल्याने हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत. यापूर्वी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ३००० रुपये मिळाले होते. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ४५०० रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana form status online
बन्ना शेख बनली रिया बर्डे...'त्या' बांगलादेशी पॉर्न स्टारबद्दल धक्कादायक खुलासा; राज कुंद्राशीही आहे कनेक्शन

तुमच्या खात्यात पैसै जमा झाले का?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड जर लिंक असेल तरच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करून घ्या. तुम्ही तुमच्या ऑनलाइन बँकिंग अॅपद्वारे खात्यात पैसे आलेत की नाही ते चेक करु शकतात. येथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन पैसे आलेत की नाही ते बघू शकतात. तसेच बँकेत जाऊनदेखील पैसे जमा झालेत की नाही चेक करु शकतात.

Majhi Ladki Bahin Yojana form status online
HC on False Promise of Marriage: लग्नाचे वचन देऊन बलात्कार, विवाहित महिला नाही करू शकत असा दावा; हायकोर्टाचे महत्वाचे निरीक्षण

लाडकी बहीण योजना काय आहे?

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ २१ ते ६० वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना देण्यात येत आहे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज

  • रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला

  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला

  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो

  • शिधापत्रिका (रेशन कार्ड), आधार कार्ड

पात्रता

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक

  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला

  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.