Manoj Jarange Patil: माझ्या मागे कोण आहे? मला पैसे कोण पुरवतो? सतत होणाऱ्या आरोपांवर जरांगे पाटील थेटच बोलले

Shantata Rally Of Jarange Patil: शांतता रॅलीच्या पहिल्या टप्प्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये ते शांतता रॅली काढत आहे. त्यांच्या या शांतता रॅलीला 7 ऑगस्टपासून सोलापुरातून सुरूवात झाली होती.
Manoj Jarange Patil Shantata Rally
Manoj Jarange Patil Shantata RallyEsakal
Updated on

राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.

दरम्यानच्या काळात अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर हे आंदोलन चिघळले होते. तसेत मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट अंगावर घेतले होते.

आशात जरांगे यांनी भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव घेत टीका सुरू केली आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक आरोपही केले आहेत.

आशात मनोज जरांगे सध्या त्यांच्या शांतता रॅलीसाठी कोल्हापूरात आहेत. आज कोल्हापूरात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, त्यांच्यामागे कोण आहे? त्यांना पैसे कोण पुरवतो? यासरख्या प्रश्नांवर भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले जरांगे पाटील?

शांतता रॅलीसाठी कोल्हापूरात आलेले मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "आता राज्यात समाजातील गोरगरिबाच्या लाट आली आहे. अशी लाट गेल्या 70 वर्षात कुणीही पाहिलेली नाही. मराठा आंदोलन हे देशात असे पहिलेच आंदोलन आहे जे सलगपणे चालू आहे.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, " या काळात माझी चौकशी करण्यासाठी सरकारने ड्रोनही पाठवलेले होते. गेल्या 11 महिन्यात माझ्यावर त्यांची नजर आहे. या आंदोलनासाठी माझ्या मागे कोण आहे? मला पैसे कोण पुरवतो? यावरही त्यांची सतत नजर असते."

शांतता रॅली

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास काही ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यामुळे राज्यात मराठा समाज आणि ओबीसींमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सामाजिक सलोख कायम राहावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर शांतता रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Manoj Jarange Patil Shantata Rally
Sharad Pawar: "पंतप्रधानांना सांगितले तरीही..." 'भटकती आत्मा'मुळेच फटका; पवारांवरील टीकेवर काय म्हणाले अजित दादा

सात जिल्ह्यांचा दौरा

मराठवाड्यातील शांतता रॅलीच्या पहिल्या टप्प्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये ते शांतता रॅली काढत आहे. त्यांच्या या शांतता रॅलीला 7 ऑगस्टपासून सोलापुरातून सुरूवात झाली होती. सोलापूरनंतर सांगली आणि कोल्हापूरात त्यांची शांतता रॅली झाली.

आता त्यांची रॅली रविवारी 11 ऑगस्ट रोजी पुण्यात असणार असून, त्यानंत ते अहमदनदरमध्ये रॅली काढणार आहेत. नाशिकमधून पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीचा समारोप होणार आहे.

Manoj Jarange Patil Shantata Rally
Bachchu Kadu-Sharad Pawar: बच्चू कडू मविआच्या वाटेवर? मोदी बागेत झाली शरद पवारांसोबत खलबतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()