छत्रपती संभाजीनगर - महायुतीतील पक्षांच्या उमेदवारांची यादी पुढील तीन दिवसात जाहीर होईल. शिवसेनेची यादी दोन टप्प्यात जाहीर होईल. अजून कुणालाही कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे याला जागा सुटणार, याचे तिकीट कापणार यावर यादी आल्याशिवाय विश्वास ठेवू नका.
लोकसभा निवडणुकीत `मविआ`ने खोटा नरेटिव्ह पसरवला होता, लोकांना ते आता लक्षात आले आहे. मराठा समाजाच्या हिताचे सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत, ते पाहता मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहावे, अशी आमची त्यांना विनंती असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.