Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहिण'साठी पैसे उकळणाऱ्या एजंटवर पहिला 'प्रहार'; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

संभाजीनगरमध्ये महिला एजंटवर गुन्हा दाखल
Vandana Mhaske_Ladki Bhin Yojna
Vandana Mhaske_Ladki Bhin Yojna
Updated on

संभाजीनगर : शासनानं महिलांसाठी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या एका महिल एजंटवर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकारे पैसे घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे, निर्देश नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. छत्रपती संभाजीनगर इथं हा प्रकार घडला आहे.

Vandana Mhaske_Ladki Bhin Yojna
Nagar Lok Sabha MockPoll : सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या ४० मतदान केंद्रांवर होणार 'मॉकपोल'; निवडणूक आयोगाचे आदेश

साम टीव्हीच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यानुसार लाडकी बहीण योजनेसाठी बहिणींची आर्थिक लूट केल्यावरून हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

Vandana Mhaske_Ladki Bhin Yojna
AARTI: बार्टीच्या धर्तीवर आर्टी! मांतग समाजासह उपजातींच्या विकासासाठी नवी संस्था

लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील वंदना म्हस्के या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना मस्के ही प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष असल्याचं लेटर हेड वापरते. या पदावरून तिनं यापूर्वीच उपोषणाचा इशारा दिला होता. शिवाय याच लेटरहेडचा वापर करून ती शासनाच्या विविध कार्यालयातून माहिती मागवत असते.

Vandana Mhaske_Ladki Bhin Yojna
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले नाहीत, मग बँका लोकांच्या खिशावरचा बोजा का वाढवत आहेत?

वंदना म्हस्के ही गरीब महिलांना लुटत असल्याची तक्रार काही महिलांनी तहसीलदारसमोर केली होती, त्यानंतर या महिलांचे जबाब नोंदवून घेत तहसिलदारांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अनुदान मंजूर करण्यासाठी, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी वंदना मस्के ही गोरगरीब महिलाकडून पैसे उकळत होती. पैसे देऊन देखील अनुदान खात्यावर जमा होईना म्हणून महिलांनी म्हस्के यांच्याकडं विचारणा केली असता ही महिला धमक्या देत असल्यानं महिलांनी तहसीलदारांकडं धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.