- परवेज खान
छत्रपती संभाजीनगर - राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली.
या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ मिळत आहे. त्यासाठी मराठवाडा, खानदेशातील महिलांनी पोस्टाचे ८ लाख ५९ हजार २४९ उघडल्यामुळे पोस्टाला लाडकी बहीण पावल्याचे चित्र आहे.